परभणी : सीबीएसई पॅटर्नचा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री सुभाष चरकपल्ली ९४.२० टक्के गुण घेऊन प्रथम आली. सीबीएसई पॅटर्न अभ्यासक्रमात जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. भाग्यश्री चरकपल्ली हिच्यासह निकिता नामदेव नखाते हिने ९३ टक्के गुण मिळविले असून ती द्वितीय आली आहे. शीतल सतीश मोरे ही ९२.२० गुण घेऊन तृतीय आली. तर याच शाळेचा गुणवंत अहिरे याने ८२.२० टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे. तसेच येथील क्विन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी प्रतीक्षा श्रीराम पवार हिने ८५ टक्के गुण घेतले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}