बी. कॉम. झालेली मीनाक्षी करायची तपासणी-गर्भपात; मेडिकल, डॉक्टरांसह लॅबचालकांचे नेटवर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:30 IST2026-04-30T16:28:42+5:302026-04-30T16:30:02+5:30

आधीच्या दोन गर्भपात रॅकेटचे तपास आश्चर्यकारकरीत्या रखडले : दाम्पत्याच्या संपर्कातील ते चार डॉक्टर कोण? 

B. Com. Meenakshi did illegal test and abortion; Network of medical, lab operators including doctors exposed in Chhatrapati Sambhajinagar | बी. कॉम. झालेली मीनाक्षी करायची तपासणी-गर्भपात; मेडिकल, डॉक्टरांसह लॅबचालकांचे नेटवर्क

बी. कॉम. झालेली मीनाक्षी करायची तपासणी-गर्भपात; मेडिकल, डॉक्टरांसह लॅबचालकांचे नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : कुठलेही वैद्यकीय शिक्षण, तांत्रिक पदवी नसताना मंगेश सुखदेव थोरात व त्याची पत्नी मीनाक्षी हे दाम्पत्य बिटेल डायग्नोस्टिक पॅथ लॅब चालवत होते. कोणाला संशय येऊ नये, म्हणून एन-५ परिसरासारख्या उच्चभ्रू वसाहतीमधील एका रहिवासी घराच्या पहिल्या मजल्यात त्यांनी ही लॅब थाटली होती. विशेष म्हणजे, लॅबच्या प्रथमदर्शनी बोर्डावर ना डॉक्टराचे नाव आहे किंवा लॅब चालकाच्या डिग्रीविषयी देखील उल्लेख ! भांडाफोड झाल्याचे कळताच मंगेश पसार झाला आहे.

पैशांच्या हव्यासापोटी मानवतेची मर्यादा ओलांडत रशीदपुऱ्यात दहावी उत्तीर्ण सय्यद इर्शाद अहेमद सय्यद गनी (६१), शाहेदा परवीन सय्यद इर्शाद अहमद (५१, दोघे रा. रशीदपुरा) व त्यांची मदतनीस नसरीन नजीर शेख (४७, आझाद चौक) यांनी घरातच औषधी, शस्त्रांच्या साठ्यासह ‘मिनी ऑपरेशन थिएटर’ उभारून अवैध गर्भपाताचा क्रूर धंदा सुरू केला होता. सोमवारी रात्री गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम, कांचन मिरधे यांनी छापा टाकून याचा पर्दाफाश केला. बुधवारी पोलिसांनी यात आरोपींसमक्ष फ्लॅटचा पंचनामा करून त्यांचे जबाब नोंदवले. मंगेशचा शोध गुन्हे शाखेसह सिटी चौक पोलिसांचे पथक घेत आहे.

तपासणीसाठी ३५ हजार रुपये
मंगेश व मीनाक्षीचे ग्रामीण भागात मोठे नेटवर्क आहे. डॉक्टरांकडे गेलेल्या दाम्पत्याला मुली नकोशा असतील तर डाॅक्टर, मेडिकल चालकांकडून त्यांना गर्भलिंगनिदानासाठी मंगेशकडे पाठवले जायचे. अन्यत्र गर्भलिंगनिदानास बंदी असल्याचे सांगून सुरक्षेची हमी देत हे दोघे ३५ हजार रुपयांपर्यंत दर आकारायचे. विशेष म्हणजे, यापूर्वी उघडकीस आलेल्या रॅकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, टॅबचाच मंगेश वापर करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

मीनाक्षीची संचालिका म्हणून नोंद
मे, २०२१ मध्ये सुरू झालेली ही लॅब दुसऱ्याच्या कागदपत्रांवर सुरू झाल्याचा संशय पोलिसांना आहे. ऑनलाइन नोंदीमध्ये मात्र मीनाक्षी मंगेश थोरात हीच या लॅबची संचालिका असल्याचे दाखवले आहे.
तालुक्यातील पळशी येथे देखील मंगेशने अशीच एक लॅबची दुसरी शाखा उघडली होती. गेल्या पाच वर्षांत त्याने दोन शाखा उघडून महागड्या मशिनरी देखील खरेदी केल्याने गर्भपातासारख्या रॅकेटमधून पैसे कमावल्याचे सांगितले जात आहे. मीनाक्षी बी.कॉम. असतानाही महिलांच्या तपासण्यांपासून गर्भपातापर्यंत सर्व प्रक्रिया करत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली.

लॅबचालकांचाही रॅकेटमध्ये सहभाग
मार्च महिन्यामध्ये नारेगावमध्ये घरातच विवाहितेचा गर्भपात करण्यात आला. या गुन्ह्यात मराठवाड्यात अनेक वर्षांपासून गर्भपाताचे रॅकेट चालवणाऱ्या रेडिऑलॉजिस्ट डाॅ. संतोष सोनवणेनेच या गर्भपाताची सुपारी घेतल्याचे समजले. मात्र, यात मयूर पार्क येथील फेबो डोमेस्ट महालॅबचा अनिल जाधव (सपकाळ) याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
५ एप्रिल राेजी साताऱ्यात समोर आलेल्या गर्भपाताच्या रॅकेटमध्ये लॅबचालकाचा सहभाग निष्पन्न झाला होता. मात्र, दोन्ही गुन्ह्यांतील मास्टरमाइंडसह लॅबचालकाचा शोध मात्र लागू शकला नाही.

Web Title : बी.कॉम स्नातक डॉक्टर, लैब के साथ अवैध गर्भपात रैकेट में शामिल

Web Summary : एक बी.कॉम स्नातक और उसके पति ने अवैध गर्भपात रैकेट चलाया, जिसमें मरीजों का शोषण किया गया। उन्होंने डॉक्टरों और लैब मालिकों के साथ सहयोग किया। पुलिस नेटवर्क की जांच कर रही है, जिसमें राज्य भर में इसी तरह के अपराधों में शामिल अन्य लैब संचालक भी शामिल हैं।

Web Title : B.Com Graduate Involved in Illegal Abortion Racket with Doctors, Labs

Web Summary : A B.Com graduate and her husband ran an illegal abortion racket, exploiting patients with high fees. They collaborated with doctors and lab owners. Police are investigating the network, including other lab operators involved in similar crimes across the state.