शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचे हक्क जाणीव व जागृती

By admin | Updated: June 1, 2014 00:25 IST

जागतिक बाल हक्क दिन : सगळीकडे उदासीनताच

त्र्यंबक वडसकर, परभणी बालकांचा सर्वांगीण विकास होऊन प्रत्येक बालकाला समान संधी मिळावी, या उद्देशाने बालकांचे हक्क करण्यात आले़ परंतु, याबाबतची समाजात जाणीव व जागृती निर्माण होणे गरजेचे आहे़ आज जागतिक बाल हक्क दिनाच्या निमित्ताने बाल हक्कासंदर्भात घेतलेला आढावा़ आंतरराष्ट्रीय स्तरावर बाल हक्कासंदर्भात कार्य करणार्‍या युनीसेफ या संस्थेने १९८९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत बाल हक्क संहिता तयार केली़ यामध्ये मुख्य बाल हक्क खालीलप्रमाणे आहेत़ बालकाचा जगण्याचा, विकासाचा, सुरक्षिततेचा व सहभागीतेचा हक्क मुख्य मानल्या जातो़ यामध्ये बालकांना चांगला आहार, निवारा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन व समृद्ध पर्यावरण ही हक्क मांडण्यात आली आहेत़ यासाठी ५४ कलमी संहिता तयार करण्यात आली असून, बालकांचे हक्क सविस्तर मांडले आहेत़ बालकांचा हक्क हा शब्दच अनेकांना चकित करणारा दिसतो़ बालकांनाही हक्क असतात़ या बाल हक्काबाबत बालक, पालक, समाज यांची उदासीनता दिसून येते़ या बालकांच्या हक्काबाबत समाजात जाणीव जागृती निर्माण करणे गरजेचे आहे़ बालकांच्या विविध समस्यांबाबतही गांभीर्याने विचार केला जात नाही़ बालकांच्या अनेक समस्या असतात़ दारिद्र्य, अज्ञान, परंपरागत चालीरिती यांच्या बंधनात अडकलेल्या कुटुंबातील मुले आणि नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत सापडलेले अपंग मुलं यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात़ या अडचणींतून बाहेर काढण्यासाठी कुटुंब, समाज, शासन, प्रशासन यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे़ यासाठी बालकांना बाल हक्क समजून ते समाजातील प्रत्येक घटकालाही कळायला हवे़ परंतु, बर्‍याच ठिकाणी बालकांच्या हक्काची पायमल्ली होताना दिसते़ बालकांच्या हक्काची सुरुवात ही कुटुंबातच व्हावी़ राज्य बाल हक्क आयोग अडीच वर्षांपासून बंद आहे़ शासनाची बाल हक्क धोरणाबाबतची उदासीनता दिसून येते़ भारतात अनेक राज्यांमध्ये बाल हक्क धोरण राबविले जात असताना महाराष्ट्रामध्ये बाल हक्क धोरण राबविल्या जात नाही़ मुलांच्या कल्याणासाठी व विकासासाठी शासनाने धोरण जाहीर केले, तर त्यानुसार कायदे निर्माण होऊन अनेक बालविकासाबाबत कार्यक्रम आखल्या जातील़ तसेच जनजागृती व अंमलबजावणीही होईल़ सूर्यकांत कुलकर्णी, सामाजिक आर्थिक विकास संस्था केरवाडी