शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-तिरुपती आणखी एक फेरी

By admin | Updated: May 29, 2014 00:21 IST

पूर्णा : मराठवाड्यातून तिरुपती देवस्थानाला जाणार्‍या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे विभागाने औरंगाबाद- तिरुपती या विशेष रेल्वेची आणखी एक फेरी

पूर्णा : मराठवाड्यातून तिरुपती देवस्थानाला जाणार्‍या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे विभागाने औरंगाबाद- तिरुपती या विशेष रेल्वेची आणखी एक फेरी वाढविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. उन्हाळ्याच्या सुट्यात मराठवाड्यातून तिरुपती देवस्थानाला जाणार्‍या भाविकांची संख्या मोठी असते. नियोजित आरक्षणक्षमता व प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती (गाडी क्र.०७४०५) ही विशेष रेल्वे औरंगाबाद स्थानकाहून सोडण्यात आली होती. या गाडीला मिळालेल्या प्रतिसादानंतर पुन्हा परत दक्षिण मध्य रेल्वेकडून ३० मे शुक्रवार रोजी या गाडीची आणखी एक फेरी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून दुपारी ३ वाजता सुटणार असून परभणी, नांदेड, निजामाबाद, सिकंदराबादमार्गे तिरुपती येथे ३१ मे रोजी दुपारी ३.३० वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी तिरुपती रेल्वेस्थानकावरुन शनिवारी सायंकाळी ५ वाजता सुटणार असून दुसर्‍या दिवशी ही गाडी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीला १५ डब्बे असून त्यामध्ये एक वातानुकूलीत थ्री टायर, सहा स्लीपर कोच, सहा जनरल डब्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) प्रवाशांकडून स्वागत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून उन्हाळ्याच्या सुट्यात तिरुपती देवस्थानासाठी दोन वेळा सोडण्यात आलेल्या या विशेष रेल्वेच्या निर्णयाचे मराठवाड्यातील भाविकांकडून स्वागत होत आहे.