शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅन्टी रेबीज लसीचा तुटवडा; मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच

By admin | Updated: September 18, 2014 00:42 IST

औरंगाबाद : कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला रेबीज हा जीवघेणा आजार होण्याचा धोका असतो

औरंगाबाद : कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला रेबीज हा जीवघेणा आजार होण्याचा धोका असतो, त्यामुळे अशा रुग्णांना तातडीने अ‍ॅन्टी रेबीज सिरम (ए.आर.एस.) इंजेक्शन आणि अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन (ए.आर.व्ही.) दिले जाते. मात्र, दोन महिन्यांपासून औरंगाबाद शहरात अ‍ॅन्टी रेबीज सिरमचा तुटवडा आहे. घाटीसह शहरातील खाजगी औषधालयातही अ‍ॅन्टी रेबीज सिरम उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांची चिंता वाढली आहे.
औरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे. कुत्रा चावल्यानंतर उपचार घेण्यासाठी घाटीत रोज सरासरी चार ते पाच रुग्ण येतात. यात बरेच रुग्ण पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे थेट घाटीत येतात. कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या जखमेमध्ये रेबीजचे विषाणू असतात. रेबीजच्या विषाणूंना तातडीने नियंत्रणात न आणल्यास ते मेंदूपर्यंत जातात आणि रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका असतो. पिसाळलेल्या कुत्र्यापासून रेबीज होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा रुग्णांना तातडीने अ‍ॅन्टी रेबीज सिरम देण्यात येते. सहा महिन्यांपासून घाटीत अ‍ॅन्टी रेबीज सिरमचा तुटवडा आहे. आता तर शहरातील मेडिकल स्टोअरमध्येही अ‍ॅन्टी रेबीज सिरम मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची चिंता वाढली आहे. रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन वेळेवर घेणेही आवश्यक असते. सूत्रांनी सांगितले की, अ‍ॅन्टी रेबीज सिरमची मागणी सर्व शहरात असते. मात्र, त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. परिणामी शहरातही रेबीज प्रतिबंधक इंजेक्शनचा तुटवडा आहे. शिवाय ते महागडे असल्याने सर्वच मेडिकलचालक ठेवत नाहीत.