शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद मुलगा संस्कार विसरला; हात उचलताच वडिलांनी फावड्याने डोक्याचा भुगा केला

By सुमित डोळे | Updated: September 23, 2023 16:04 IST

पोलिसी खाक्या दाखवताच हत्येची कबुली

छत्रपती संभाजीनगर : रोज शिवीगाळ करून छळ करणाऱ्या आकाश राजू ऊफाड (२५, रा. पडेगाव) याने गुरुवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत वडिलांना मारहाण केली. रोजच्या या त्रासाला कंटाळून संतप्त वडील राजू शेणफड उफाड (५२) याने मुलगा झोपताच फावड्याने डोके फोडून त्याची हत्या केली. यासंदर्भात घरमालकाने पोलिसांना कळविले. त्यानंतर ठाण्यात दहा तास नामानिराळे राहणाऱ्या बापाला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली.

मजुरी काम करणारा राजू, पत्नी सविता, म़ृत मुलगा आकाश हे पडेगाव येथे राहात होते, तर मोठा मुलगा सागर हा पद्मपुऱ्यात राहतो. सागर लालबागच्या दर्शनासाठी मुंबईला आणि पत्नी लक्ष्मी सणासाठी पुण्याला मुलीकडे गेली होती. त्यामुळे आकाश व राजू हे दोघेच घरी होते. २१ सप्टेंबरला आकाश घरी गेल्यानंतर त्यांनी सोबत जेवण केले. मात्र, रोजच्याप्रमाणे पुन्हा त्याने वडिलांसाेबत वाद घातला. रोज पत्नी असल्याने वाद मिटत होता. पण, गुरुवारी वाद वाढतच गेला. आकाशने शिवीगाळ करत वडिलांना बेदम मारहाण केली व झोपी गेला. मुलाच्या या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या संतप्त वडिलाने गाढ झोपलेल्या मुलाचे डोके फावड्याने अक्षरक्ष: फोडून त्याची हत्या केली.

नामनिराळे राहण्याचा प्रयत्न
घटनेनंतर राजूने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. मुलाची अज्ञाताने हत्या केल्याचे घरमालकाला सांगितले होते. छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने, सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले, उपनिरीक्षक प्रमोद देवकते, गणेश केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. आकाशच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. शवविच्छेदन होईपर्यंत पोलिसांनी राजूची चौकशी केली नव्हती. झोपेतून पहाटे साडेतीन वाजता लघुशंकेसाठी उठल्यानंतर मुलगा थेट अर्धनग्न अवस्थेत रक्तबंबाळ अवस्थेत दिसल्याचे राजू सांगत होता. चार वाजता मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सर्व कबुली दिली. रोज मला शिवीगाळ करायचा. गेल्या काही दिवसांत सतत गळा दाबून श्वास बंद करायचा. गुरुवारी पत्नी घरात नसल्याने संताप अनावर झाला आणि मुलाला मारून टाकल्याची कबुली त्याने दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद