अंबड कृउबाससाठी ९७ टक्के मतदान

By Admin | Updated: August 10, 2015 00:56 IST2015-08-10T00:47:26+5:302015-08-10T00:56:52+5:30

अंबड : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत तब्बल ९७.४२ टक्के मतदान झाले. तालुक्यातील सात मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले

97 percent polling for Ambad Krubas | अंबड कृउबाससाठी ९७ टक्के मतदान

अंबड कृउबाससाठी ९७ टक्के मतदान


अंबड : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत तब्बल ९७.४२ टक्के मतदान झाले. तालुक्यातील सात मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. एकूण २ हजार १३३ मतदारांपैकी २ हजार ७६ मतदारांनी आपला हक्क बजावला.
आघाडीविरूध्द महायुती यांच्यातील अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीतील मतदानाचा टक्का अपेक्षेप्रमाणे चांगलाच वाढला. सकाळपासून चांगल्या संख्येने मतदानाला सुरूवात होऊन दुपारपर्यंत बहुतांश मतदान पूर्ण झाले. सेवा सहकारी संस्था (सोसायटी) मतदार संघातील सहा केंद्रावर एकूण ९३१ मतदारांपैकी ९१७ (९८.५० टक्के) मतदारांनी मतदान केले. यामध्ये अंबड ९९ टक्के, रोहिलागड ९८.४४ टक्के, पारनेर ९९.४४ टक्के, वडीगोद्री ९६.२४ टे, साष्ट पिंपळगाव १०० टक्के, गोंदी ९८.६७ टक्के. ग्राम पंचातय संघातील सहा केंद्रावर एकूण ८९४ मतदारांपैकी ८६१ (९६.३१ टक्के) मतदारांनी मतदान केले. यामध्ये अंबड ९६.५२ टक्के, रोहीलागड ९५.४८ टक्के, पारनेर ९६.१५ टक्के, वडीगोद्री ९५.४८ टक्के, साष्ट पिंपळगाव ९७.९६ टक्के, गोंदी ९६.९९ टक्के. व्यापारी मतदार संघात १९५ पैकी १८९ जणांनी मतदान केले. हमाल मापाडी मतदार संघातील १११ पैकी १०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (वार्ताहर)

Web Title: 97 percent polling for Ambad Krubas