शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

५४ लाखांचे धनादेश बळीराजाकडेच पडून!

By admin | Updated: May 31, 2014 01:25 IST

रऊफ शेख, फुलंब्री फुलंब्री तालुक्यातील दीड हजार शेतकर्‍यांना विविध अनुदानापोटी दिलेले ५४ लाखांचे धनादेश गेल्या सहा महिन्यांपासून घरात पडून असून,

रऊफ शेख, फुलंब्री फुलंब्री तालुक्यातील दीड हजार शेतकर्‍यांना विविध अनुदानापोटी दिलेले ५४ लाखांचे धनादेश गेल्या सहा महिन्यांपासून घरात पडून असून, ते तात्काळ बँकेत टाकण्यासाठी तहसीलदारांनी शेतकर्‍यांना दोन दिवसांची मुदत दिली आहे. फुलंब्री तालुक्यातील ज्या गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे, अशा गावातील शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात आली. फुलंब्री तालुक्यात ४५ हजार शेतकर्‍यांना १३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते. हे वाटप गेल्या आठ महिन्यांपासून सुरू होते. तालुक्यातील १ हजार ८०० शेतकरी असे आहेत, ज्यांनी धनादेश नेला; पण बँकेत टाकला नाही व घरातच ठेवला. त्याची एकूण रक्कम ५४ लाख इतकी आहे. तहसील कार्यालयाकडून सर्वच रक्कम बँकेत टाकण्यात आली; पण शेतकर्‍यांनी बँकेतून पैसे काढले नाहीत. तहसीलदारांनी याबाबत शेतकर्‍यांना सूचना केली असून, आपले धनादेश येत्या दोन दिवसांत बँकेत जमा करून पैसे घ्यावेत, नसता बँकेतील रक्कम परत जाणार असल्याचे तहसीलदार रेवणनाथ लबडे यांनी सांगितले.एकीकडे सरकारी अनुदान वेळेवर मिळत नाही किंवा अद्यापपर्यंत आलेच नाही, अशी ओरड शेतकर्‍यांकडून केली जात असतानाच फुलंब्री तालुक्यातील शेतकर्‍यांचा नाकर्तेपणा यामुळे दिसून आला आहे. दोन दिवसात या शेतकर्‍यांनी धनादेश न वटविल्यास त्या रकमेवर त्यांना पाणी सोडावे लागले. ‘दैव देते अन् कर्म नेते’ या म्हणीचा प्रत्यय यावेळी येऊ शकतो. त्यामुळे संबंधित शेतकर्‍यांनी तात्काळ बँक गाठणे गरजेचे आहे.