शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

५० % कर्मचार्‍यांवरच चालतोय कारभार !

By admin | Updated: May 29, 2014 00:28 IST

लोहारा : तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपीक, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून ३५ पदे मंजूर असताना ३१ पदे भरली गेली.

लोहारा : तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपीक, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून ३५ पदे मंजूर असताना ३१ पदे भरली गेली. परंतु, यापैैकी सातजण निलंबित आहेत. चार जागा रिक्त तर एकजण रजेवर गेल्यामुळे उर्वरित १९ जणांवर तहसीलचा कारभार चालू आहे. लोहारा तहसील कार्यालयात नायब तहसीलदाराची तीन पदे मंजूर असताना दोनच भरली गेली. अव्वल कारकूनची चारही पदे भरली गेली. यापैैकी एकाविरूद्ध चार दिवसांपूर्वीच निलंबनाची कारवाई झाली आहे. तर अन्य एकजण प्रतिनियुक्तीवर असल्याने सध्या दोघेजणच कार्यरत आहेत. लिपीकाची आठ पदे मंजूर असताना सहा भरली गेली. त्यातील दोन पदे रिक्त तर दोघेजण चार दिवसापूर्वी निलंबित झाले. त्यामुळे आजघडीला अख्ख्या कार्यालयात दोनच लिपीक कार्यरत आहेत. तीन मंडळ अधिकार्‍यांची पदे मंजूर असून, यातील एकाची उमरगा येथे बदली झाली आहे. वाळू प्रकरणी . दोघेजण निलंबित झाले. त्यामुळे सध्या या कार्यालयाचा कारभार मंडळ अधिकार्‍याशिवाय सुरू आहे. तलाठ्याची १७ पदे मंजूर असून, १६ भरली गेली. एक जागा रिक्त आहे. तसेच १६ पैकी दोघेजण निलंबित झाले. त्यामुळे आता १४ तलाठ्यांच्या खांद्यावर ४७ गावांचा कारभार आला आहे. (वार्ताहर) कोतवाल कार्यालयात लोहारा तालुक्यात काही प्रमाणात असलेले कोतवाल हे तहसील कार्यालयातच कोणत्या ना कोणत्या विभागाचे काम करताना दिसतात. अशीच परिस्थिती शिपायाची आहे. नेमून दिलेली कामे सोडून दुसरीच कामे करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तहसीलमध्ये गर्दी सध्या तहसील कार्यालयात नागरिक आपल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी लागणारी विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे कामे वेळेत होत नसल्याने लोकांतून ओरड होत आहे. लेखा विभाग तलाठ्याकडे ! तहसील कार्यालयातील महत्वाचा विभाग म्हणजे लेखा विभाग. या विभागातून तहसीलदारासह सर्व कर्मचार्‍यांच्या पगारी, अनुदान आदींचा लेखाजोखा या विभागात होतो. हा कार्यभार एम.जी. जाधव यांच्याकडे होता.परंतु, त्यांची बदली उमरगा तहसील कार्यालयाला झाली. त्यामुळे गेले दोन ते तीन महिन्यापासून लेखा विभागाचा कारभार तलाठी व्ही.बी. कोळी हे पाहत आहेत. कर्मचारी हैराण गेले महिनाभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कोण ना कोण निलंबित होत आहे. निलंबित होणार्‍यांमध्ये अधिकार्‍यांपेक्षा कर्मचारीही अधिक आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचार्‍यांवर त्यांच्या कामाचा अतिरिक्त भार हा राहिलेल्या कर्मचार्‍यांवर पडला आहे. त्यामुळे संचिका निकाली निघण्यास विलंब होवू लागला आहे. सध्या या कार्यालयात प्रभारीराज सुरू आहे.