शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचे २० % पाणी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:56 IST

पैठण रोडवरील ज्या कंपन्यांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो त्या कंपन्यांच्या पाण्यात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मार्च महिना संपत आला असून, पाराही वाढत चालला आहे. शहरात पाण्याची मागणी दुप्पट झाली आहे. महापालिका समाधानकारक पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे नगरसेवकांकडून आतापासूनच पाण्यासाठी ओरड सुरू झाली. सोमवारी सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे पैठण रोडवरील ज्या कंपन्यांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो त्या कंपन्यांच्या पाण्यात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. हळूहळू या पाण्यात आणखी कपात करण्याची घोषणाही महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली.

शहराला दररोज २०० एमएलडी पाण्याची गरज असताना महापालिका चार दिवसाआड, आठ दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. पाणी प्रश्न दरवर्षी उन्हाळ्यात पेट घेतो. यंदा मार्च महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये महापालिका कुठे चार दिवसाआड, तर कुठे सहा दिवसाआड पाणी देत आहे. सर्वसामान्य नागरिक पाणीपुरठ्यावर अजिबात समाधानी नाहीत. शहराच्या चारही बाजूने गुंठेवारीअंतर्गत ७० ते ८० नवीन वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतींना मागील अनेक वर्षांपासून महापालिका टँकरने पाणीपुरवठा करीत आहे. सोमवारी सर्वसाधारण सभेत महिला नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर ओरड सुरू केली. विविध पक्षाच्या नगरसेवकांनीही आपल्या वॉर्डातील समस्या सांगितल्या. दररोज १३० ते १३५ एमएलडी पाणीच शहरात येते. या पाण्याचे अत्यंत बारकाईने नियोजन करून वाटप करण्यात येत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत महापालिकेच्या मुख्य लाईनवरून विविध कंपन्यांना पाणी देण्यात येते. या पाण्यात कपात करण्यात यावी. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, कंपन्यांना पाणी कसे काय देता, असा रोषही नगरसेवकांनी व्यक्त केला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी कंपन्यांना देण्यात आलेल्या पाण्यात २० टक्के कपात करण्यात यावी, असे आदेश प्रशासनाला दिले.

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी