११ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

By Admin | Updated: May 28, 2014 00:23 IST2014-05-27T23:56:47+5:302014-05-28T00:23:27+5:30

जालना : जिल्ह्यातील अकरा पोलिस निरीक्षकांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत. तर बाहेरील जिल्ह्यातून सात पोलिस निरीक्षक बदलून यत आहेत.

11 Police Inspectors Transfers | ११ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

११ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

 जालना : जिल्ह्यातील अकरा पोलिस निरीक्षकांच्या अन्य जिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत. तर बाहेरील जिल्ह्यातून सात पोलिस निरीक्षक बदलून यत आहेत. जालना पोलिस प्रशिक्षण विद्यालयातील भास्कर वायफळ यांची धूळे, मसूदखान महेबूबखान यांची नाशिक ग्रामीण, यशवंत जाधव यांची औरंगाबाद ग्रामीण, शंकर काळे यांची मुंबई, रमेश घोडके यांची बीड, प्रदीप पालीवाल यांची नांदेड, मधुकर पवार सोलापूर ग्रामीण, दिलीप भागवत नाशिक ग्रामीण, शेख सलीम यांची औरंगाबाद शहर येथे तर भोकरदन येथील राजेंद्रसिंह गौर यांची व जालन्याचे गफूर सद्रोद्दीन पाटील औरंगाबाद येथे बदली झाली आहे. नागपूर येथील सुरेश बुधवंत, हिंगोली येथून शेख रफिक चाँद, लातूर येथील रंगनाथ नागरे व गृह अन्वेषण विभागातील सुरेंद्र माळाळे हे पोलिस विद्यालयात बदलून येत आहेत.

Web Title: 11 Police Inspectors Transfers