शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

दोन रुपयांमध्ये दहा लिटर शुद्ध पाणी!

By admin | Updated: May 26, 2014 01:19 IST

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद शहरी भागात राहणार्‍या नागरिकांना आज शुद्ध पाणी मिळत आहे.

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद शहरी भागात राहणार्‍या नागरिकांना आज शुद्ध पाणी मिळत आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गांधेली ग्रामपंचायतीने दोन रुपयांच्या क्वाईनमध्ये १० लिटर शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतीने गावातील सफाई, व्यावसायिक दृष्टिकोन, शेतातील पाण्याचे योग्य नियोजन इत्यादी उपक्रम राबविले. गावाने एकात्मिक पाणलोट विकास व्यवस्थापन कार्यक्रमातही आघाडी घेतली. जवळपास एक कोटी रुपये खर्च करून गावविकासाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले जात आहे. पाणी हा सर्वांत मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. ग्रामपंचायतीने गावाला शुद्ध पाणी देण्याचे धोरण स्वीकारले. पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून पाणीपुरवठा करण्याऐवजी प्लांटमध्ये शुद्ध केलेले पाणी गावाला वाटप करण्याची योजना ग्रामसभेत मंजूर करण्यात आली. शुद्ध पाण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. ज्यांना पाणी हवे असेल त्यांनी दोन रुपये क्वाईन बॉक्समध्ये टाकायचे अन् १० लिटर शुद्ध पाण्याचा जार घेऊन जायचे, असे नियोजन करण्यात आले आहे. ही योजना २४ तास सुरू राहणार आहे. गावात दिवसरात्र पाणी शुद्ध करण्याचे काम सुरू असते, एक लिटर पाण्याची बाटली बाहेरून आणण्यासाठी १५ ते २० रुपये खर्च येतो. त्यापेक्षा थंडगार व शुद्ध दहा लिटर पाणी घरात घेऊन जाणे गांधेलीवासीयांसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. शहरात अनेक व्यापारी पाण्याचा जार खरेदी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगारांनी शुद्ध पाणीपुरवठ्याची यंत्रणा उभारली आहे. गांधेली गावचे सरपंच राहुल सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, व्यवस्थापन समितीसोबत शुद्ध पाण्याचे विविध प्रकल्प पाहिले. अगदी कमीत कमी किमतीत नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, या दृष्टीने काम करण्यात आले. सर्वांनीच त्यासाठी सहमती दर्शविल्याने गावात आनंदाची लहर निर्माण झाली. या कामासाठी सचिव के.एस. देशपांडे, अरविंद ऐलम, समितीचे सचिव प्रल्हाद तळेकर आदींनी परिश्रम घेतले.