शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षांपासूनची कुस्ती परंपरा कायम

By admin | Updated: November 14, 2015 01:20 IST

दिवाळीचा सण म्हणजे गोडधोड करुन फटाक्याची आतिषबाजी करणे, एवढेच या सणाला महत्त्व दिले जाते.

ब्रह्मपुरी : दिवाळीचा सण म्हणजे गोडधोड करुन फटाक्याची आतिषबाजी करणे, एवढेच या सणाला महत्त्व दिले जाते. परंतु पेठवार्डमध्ये ६२ वर्षांपासून कुस्तीची स्पर्धा घडवून विजेत्यांना बक्षिस देऊन गौरविण्याची परंपरा अजूनही कायम आहे.पेठवार्डमध्ये कुस्ती स्पर्धा ही एखाद्या जत्रेप्रमाणे भरत असते. स्व. जैरामजी बगमारे यांच्या कल्पकतेतून ६२ वर्षांपूर्वी कुस्ती स्पर्धा भरायला सुरुवात झाली. आजही ही स्पर्धा नवीन पिढीने कायम ठेवली आहे. कुस्तीसाठी पहेलवान या क्षणाची वाट पाहत असतात. मौशी, विलम, कुर्झा, पारडी, उदापूर, मालडोंगरी, खरबी (माहेर) व आजू बाजूच्या २० कि.मी. पर्यंतच्या परिसरातून पहेलवान या कुस्त्यांच्या क्षणाची व दिवाळीच्या पाडव्याची आतुरतेने वाट पाहात असतात. या कुस्तीच्या स्पर्धेसाठी जवळजवळ १०० ते १५० कुस्तीपटू मैदानात दरवर्षी उतरत असतात. गुरुदेव सेवा मंडळ व बजरंग व्यायाम मंडळ यांच्या संयुक्त उपक्रमातून ६२ वर्षांपासून ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. लोकवर्गणीतून ही कुस्ती स्पर्धा भरवली जाते. पुर्वजांंनी सुरू केलेली ही प्रथा दिवाळीच्या गायगोदनच्या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडली जाते. प्रेक्षकांची या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. कुस्तीपटू विजेत्यांना वस्तुरुपात बक्षिस देण्याची परंपरा आजही कायम आहे. एवढेच नव्हे तर कुस्तीमंडळाला रोख रकमेच्या स्वरुपात भेट देण्याची परंपराही आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी नामांकित पाहुणे उद्घाटन तसेच बक्षिस वितरणाला बोलविल्या जात असते. या निमित्ताने पेठवार्डात घरोघरी पाहुण्यांची रेलचेल असते. या निमित्ताने ब्रह्मपुरीची आगळीवेगळी ओळख आजूबाजूच्या परिसरात झालेली आहे. जुनी संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम या वॉर्डातील नागरिकांच्या सहकार्याने अजूनही होत आहे. (तालुका प्रतिनिधी)