शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

जिल्ह्यातील ९२ पूल-रस्त्यांची कामे पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:00 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी मनुष्यबळ. तसेच आहे त्या मशनरीच्या सहाय्याने सदर कामे करण्याची परवानगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे नोडल अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागितली आहे. या परवानगीनंतर जिल्ह्यातील विविध ९२ रस्ते तसेच पुलाच्या बांधकामाचा मार्ग सुकर होणार असून येणाऱ्या आपत्तीवर मात करणे शक्य होणार आहे.

ठळक मुद्देपावसाळापूर्वीची तयारी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने मागितली परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे जिल्ह्यातील विविध रस्ते तसेच पुलांचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे कामे करणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी मनुष्यबळ. तसेच आहे त्या मशनरीच्या सहाय्याने सदर कामे करण्याची परवानगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे नोडल अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागितली आहे. या परवानगीनंतर जिल्ह्यातील विविध ९२ रस्ते तसेच पुलाच्या बांधकामाचा मार्ग सुकर होणार असून येणाऱ्या आपत्तीवर मात करणे शक्य होणार आहे.देशात तसेच राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहे. याचाच एक एक भाग म्हणून राज्यात लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यातील काही प्रमुख राज्यमार्ग व जिल्हा मार्गावर रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण तसेच नवीन तसेच जुन्या पुलांचे बांधकाम रखडले आहे.या रस्ते तसेच पुलांच्या बांधकामाअभावी भविष्यात अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळ तसेच मशनरीचा वापर करुन कामे कार्यान्वित करण्याच्या तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या सुचनांनुसार पुलांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करता यावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नोडल अधिकाऱ्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंत्याकडे परवानगी मागितली आहे.असे पाळावे लागणार नियमकार्यरत मजुरांच्या कॅम्पमध्ये असलेल्या व्यक्ती मार्फतच कामे करण्यात यावे, कॅम्प बाहेरुन कोणतेही नवीन मजूर आणण्यास तसेच कॅमवरील मजुरांना अथवा कुटुंबियांना कॅम्प साईट सोडून जाण्यास पूर्णत: प्रतिबंध करावा, मजुरांना क्षेत्रीय बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कॅम्प मध्येच दैनंदिन जिवनाश्यक गरजा भागविण्यासाठी आवश्यक असलेली सामुग्री उपलब्ध करून द्यावी, सामाजिक अंतर ठेवून प्रत्यक्ष कामे होत असल्याची खात्री करावी व त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती क्षेत्रीय ठिकाणी अवलंबिण्यात यावी.बांधकाम विभाग क्रं. १ अंतर्गत असलेली कामेधानोरा पुलाचे विअरींग कोट, घुग्घुस पुलाचे विअरींग कोट, एचएएम- १४३ पावनी ते वनसडी रस्ता, माजरी- देऊरवाडा रस्त्यावरील कोंढा नाल्यावरील पुल, वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक रस्त्याची सुधारणा, भद्रावती-चंदनखेडा रस्त्यावरील पुल, जाम-वरोरा रस्त्याचे डांबरीकरण, पडोली-छोटा नागपूर, भटाळी, किटाळी रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे आदी.हायब्रीड अ‍ॅन्युईटी योजनेअंतर्गत कामेखेडी (मूल) गोंडपिपरी, खरमत, बोरगाव, गोंडपिपरी, धाबा, हिवरा फाटा, रस्त्याचे दुपदरीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण, हिवरा दरुर- विठ्ठलवाडा व विठ्ठलवाडा वढोली रस्ता, रस्त्याचे दुपदरीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरणासह सुधारणा करणे, चंद्रपूर, जुनोना, पोंभुर्णा, नवेगाव मोरे रस्त्याची सुधारणा करणे, नवतळा-जांभुळघाट- पारडपार, टिकवी, कन्हाळगाव, डोंगरगाव, जांभुळविहिरा रस्त्यावरील लहान पुलाचे बांधकाम करणे.कार्यकारी अभियंत्याची जबाबदारीकार्यक्षेत्रावरील कॅम्पमधील मजूर, कुटुंबीय, पर्यवेक्षी कर्मचारी, अभियंते यांच्या पैकी कुणालाही कोरोना सदृष्य लक्षणे दिसून आल्यास त्याबाबत तातडीने महसूल, आरोग्य विभागास कळवावे व स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहील. कोरोना विषाणूचे संसर्गाबाबत सर्व मजुरांना व साईटवरील कर्मचाºयांना आरोग्य विषयक माहिती व मार्गदर्शक सूचना त्यांचे मातृभाषेत स्पष्टपणे अवगत करण्यात याव्यात तसेच या सूचनाचे पालन होत आहे, याची माहिती घ्यावी.काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री कार्यकारी अभियंत्यांना करावी लागणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक