शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सोनियानगरच्या महिलांचा एल्गार

By admin | Updated: May 6, 2015 01:20 IST

शहरातील सोनियानगर मधील घनकचरा प्रकल्पा पुढील आणि बगीचाच्या प्रस्तावित जागेवर मागील अनेक दिवसांपासून वास्तव्य करणाऱ्या ...

राजुरा : शहरातील सोनियानगर मधील घनकचरा प्रकल्पा पुढील आणि बगीचाच्या प्रस्तावित जागेवर मागील अनेक दिवसांपासून वास्तव्य करणाऱ्या १०० अतिक्रमणधारकांना स्थायी पट्टे देऊन त्याचे पूनर्वसन करणार नाही तो पर्यंत श्रमिक एल्गारचा संघर्ष सुरुच राहील. प्रशासनाने याची दखल घेऊन अतिक्रमणधारकांचे पूर्नवसन करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी दिला. राजुरा उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी शेकडो महिलाचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा विश्रामगृह गेटवरच पोलिसानी अडविला. त्यानंतर पाच प्रतिनिधींना निवेदन देण्यासाठी सोडण्यात आले. यावेळी अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. धनाड्याचे अतिक्रमण केव्हा काढणार, गरीबांच्या घरांवर बुल्डोजर चालविली, मोठ्या अतिक्रमण धारकांवर का नाही, असा सवाल त्यांनी एसडीओंना केला. अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी घनकचरा प्रकल्पापुढील अतिक्रमण धारक त्याच ठिकाणी राहतील, असे म्हणत अल्का चंद्रशेखर यांच्या सूचनेवरुन या झोपडपट्टीला ‘संघर्ष नगर’ असे नाव घोषित केले. प्रस्तावित बगीचाच्या जागेवरील अतिक्रमण धारकही तिथेच राहतील. अतिक्रमणग्रस्तांना न्याय द्या, असे म्हणत बारा मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. लघु वेतन गृहनिर्माण सहकारी संस्थेमधील बिना परवानगीने हडपलेल्या जमिनधारकांवर कारवाई करा, इंदिरानगर, सोनियानगर, रमाबाईनगर, बेघरवस्ती, चुनाभट्टी येथील नागरिकांना पट्टे द्यावे, चुनाभट्टी मधील बालवाडीसाठी आरक्षित ११ हजार फूट जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे, जिल्हा मध्यवर्ती बँक, राजुराचे अतिक्रमण तोडण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. याप्रसंगी अल्काताई चंद्रशेखर, विजय सिद्धावार, संगीता गेडाम, चरणदास नगराळे, मिलिंद गड्डमवार, रंगराव कुळसंगे, महिपाल मडावी, उमेश मारशेट्टीवार, राजू डोहे, बादल बेले, मालता मडावी, तुळसाबाई खडसे, रंजिता खडसे, प्रकाश खडसे, मनप्रित सिंधू, मंदा कोटनाके उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)