शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मालकाचा जीव वाचविताना झिबलीने सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

आपल्या मालकाचे प्राण धोक्यात असल्याचे झिबलीला वाटले. आणि क्षणाचाही विलंब न लावता झिबलीने त्या नागावर झेप घेतली. त्या नागाला तोंडात पकडून सापाला दूर फेकले. त्यामुळे नाग चवताळला. त्यानंतर झिबली आणि नागामध्ये दहा मिनीट झुंज झाली. झिबलीच्या भुंकण्याने तिचे दोन मित्रही मदतीला धावले. तेव्हा मात्र झिबलीने नागाचा फडशा पाडला होता. झिबलीलाही नागाने दंश केला.

ठळक मुद्देआकोला येथील घटना : श्वानाची नागाशी १५ मिनिटे झुंज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असल्याने धन्याप्रती आयुष्याच्या अखेरपर्यंत माणसाची सेवा करतो. तसाच प्रत्यय काल आला. मालकाचा जीव वाचवितांना झिबली नावाच्या कुत्रीने एका नागाशी पंधरा मिनीट झुंज देऊन आपले प्राण सोडले. त्यात नागाचाही मृत्यु झाला. ही घटना वरोरा तालुक्यातील आकोला नं १ येथील शेतशिवारात बुधवारी घडली. झिबली नावानी प्रसिद्ध असलेल्या जिबलीच्या जाण्याने गाव हळहळले.वरोरा तालुक्यातील आकोला नं. १ येथील भास्कर चवले यांच्याकडे एक कुत्री होती. त्यांनी बारा वर्षांपूर्वी ते पिल्लू आणले. त्यांचा मुलगा निखीलने त्या पिल्लाचे झिबली असे नामकरण केले. गावातीलच शामदेव उमरे यांच्या गणपत नावाच्या कुत्र्यासोबत राहून अनेक गुण झिबलीने अंगिकारले. अनेकदा झिबली आणि गणपतने रानडुकरांना पिटाळून लावले. सात-आठ वषार्पूर्वी दोघांनी मिळून एका रानडुकराचा फडशा पाडला होता. दोघांनी मिळून अनेकदा विषारी सापांना यमसदनी धाडले होते. गणपत आणि झिबलीची चांगली केमेस्ट्री जमली होती.तीन वषार्पूर्वी गणपतचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यावेळी अक्षरश: झिबली नावाची कुत्री रडल्याची आठवण गजानन उमरे सांगतात. बुधवारी भास्कर चवले, त्यांची पत्नी शशिकला मुले अनिकेत आणि निखील शेतात काम करित होते. झिबली शेतात खेळत होती. तेवढ्यात सिताबाई उमरे यांच्या शेताकडून एक नाग आपल्या मालकाच्या दिशेने झिबलीला येतांना दिसला.आपल्या मालकाचे प्राण धोक्यात असल्याचे झिबलीला वाटले. आणि क्षणाचाही विलंब न लावता झिबलीने त्या नागावर झेप घेतली. त्या नागाला तोंडात पकडून सापाला दूर फेकले. त्यामुळे नाग चवताळला. त्यानंतर झिबली आणि नागामध्ये दहा मिनीट झुंज झाली. झिबलीच्या भुंकण्याने तिचे दोन मित्रही मदतीला धावले. तेव्हा मात्र झिबलीने नागाचा फडशा पाडला होता. झिबलीलाही नागाने दंश केला.काही वेळानी चवले कुटूंबियांना ही झटापट लक्षात आली. त्यामुळे हातचे काम टाकून ते सर्वच धावले. त्यावेळी झिबलीच्या तोंडात मृत नाग असल्याचे त्यांना दिसले. चवले परिवार झिबलीला वाचविण्याच्या प्रयत्नात असताना तिने आपले प्राण त्यागले.

टॅग्स :snakeसापdogकुत्रा