शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

उश्राळ मेंढा व अन्य तीन मंजूर अंगणवाडी इमारतींना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST

गावकरी संतप्त : ग्रामपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन सावरगाव : नागभीड तालुक्यातील उश्राळ मेंढा येथील दोन अंगणवाडींना १८ सप्टेंबर ...

गावकरी संतप्त : ग्रामपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन

सावरगाव : नागभीड तालुक्यातील उश्राळ मेंढा येथील दोन अंगणवाडींना १८ सप्टेंबर २०१९ च्या पत्रानुसार मंजुरी मिळाली होती. जाहीर केलेल्या यादीत १२२ अंगणवाडयांना मंजुरी देण्यात आली. मात्र यामध्ये उश्राळ मेंढा व अन्य तीन गावांचे नाव नसल्याने डावलण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायतीने मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे निवेदनातून केला आहे.

उश्राळ मेंढा ग्रामपंचायत अंतर्गत नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम मंजुरीचे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून ग्रामपंचायला प्राप्त झाले. मात्र दीड वर्षापासून कार्यारंभाची परवानगी मिळाली नाही. येथे तीन अंगणवाड्या आहेत. यातील एक अंगणवाडी जीर्ण झाल्याने निर्लेखन करण्यात आले. नवीन इमारत नसल्याने क्रमांक दाेन व निर्लेखित केलेली एक अंगणवाडी अशा दोन्ही अंगणवाड्या एकाच ठिकाणी भरतात. ही इमारतही जीर्ण आहे. पावसाळ्यात ताळपत्री टाकावी लागते १२२ अंगणवाड्यांना जि.प. कडून मंजुरी प्राप्त झाली. यामध्ये उश्राळ मेंढा येथील दोन्ही अंगणवाडींना डावलण्यात आले आहे. प्रशासकीय आदेश असूनही इमारत बांधकामाची अंमलबजावणी झाली नाही. आवश्यकता व प्राधान्यक्रमांकानुसार नव्हे तर मनमर्जीतून यादी तयार केली आहे, असा आरोप गावक-यांनी केला. हा अन्याय दूर करण्याची मागणी ग्रामपंचायतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे निवेदनातून केली. शिष्टमंडळात जि.प.सदस्य नयना गेडाम, सरपंच हेमराज लांजेवार, ग्रा. पं.सदस्य प्रभाकर सेन्द्रे,आशा बोरकर, शेवंता बोरकर, सविता सयाम आदींचा समावेश होता.

न्याय न मिळाल्यास आंदोलन

जि. प. ने निर्लेखित केलेली अंगणवाडी जीर्ण इमारतीतच तर एक नवीन समाजमंदिरात भरते. ही अडचण लक्षात घेऊन गावात नवीन अंगणवाडी उभारणे आवश्यक होते. न्याय न मिळाल्यास अंगणवाडीला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामपंचायतने दिला.

कोट

आलेवाही, सावर्ला, उश्राळ मेंढा, जीवनापूर येथील अंगणवाडयांना मंजुरी मिळाली. परंतु डावलण्यात आले व नव्या गावांना अंगणवाडीची मंजुरी दिली. हा या क्षेत्रावर अन्याय आहे.

- नयना गेडाम, सदस्य जि. प. वाढोणा -गिरगांव जि.प.क्षेत्र