शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:33 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या निकालानंतर वैद्यकीय शिक्षणात राष्ट्रीय स्तरावरील ओबीसींचे आरक्षण....

वैद्यकीय शिक्षणाच्या आरक्षणात कपात : शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या निकालानंतर वैद्यकीय शिक्षणात राष्ट्रीय स्तरावरील ओबीसींचे आरक्षण २७ टक्क्यावरुन दोन टक्क्यावर आणण्याचे कारस्थान रचले गेले. यावरुन संपूर्ण देशात ओबीसींमध्ये असंतोष पसरला आहे. मात्र आरक्षणात कपात केल्याची माहिती केंद्राच्या आरोग्य विभागापासून दडवून ठेवण्यात आल्याचा प्रकार राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या केंद्रीय आरोग्यमंत्री ना. जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून समोर आला आहे. ना. नड्डा यांनी याची गंभीर दखल घेत सहसचिवासह संबधीत यंत्रणेची कानउघाडणी केली. दरम्यान गुरूवारी ओबीसींच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या भेटीदरम्यान शिष्टमंडळात खा. नाना पटोले, संयोजक प्रा. बबनराव तायवाडे, राजकीय समन्वयक तथा माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, निमंत्रक सचिन राजूरकर, खेमेंद्र कटरे, अ‍ॅड. जय ठाकूर, हंसराज जांगीड, गुडरी व्यंकटेश्वर राव, मनोज चव्हाण, सुरेंद्र आर्य आदींचा समावेश होता. ७ मे रोजी संपूर्ण देशात वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालावर नजर टाकली असता ओबीसी उमेदवारांनी नेत्रदीपक यश संपादन केले. यात संपूर्ण देशात वैद्यकीय प्रवेशासाठी ६३ हजार ८३५ जागांमधून १५ टक्के जागा राष्ट्रीय स्तरावर आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. या जागांपैकी १५ टक्के जागा या अनुसूचित जातीसाठी तर ७.५ टक्के जागा या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आल्या. मात्र, आरक्षणाचे सर्व निकष व सूचना तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ओबीसीसाठी केवळ ६८ जागा आरक्षित ठेवल्या. ओबीसींना नियमाप्रमाणे २७ टक्के आरक्षण असताना दोन टक्क्याहून सुद्धा कमी आरक्षण ठेवण्यात आले. यात तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि जम्मू व काश्मीर या राज्याना वगळण्यात आले, ही माहिती सीबीएसईने केंद्रापासून लपवून ठेवली, असे निवेदनात म्हटले आहे. सीबीएसईप्रमुखांची कानउघकडणीयाप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री ना. जे. पी. नड्डा यांनी आरोग्य विभागाचे सहसचिव अरुण सिंघल यांना पाचारण केले. सिंघल यांनीही प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर दुरध्वनीवरून सीबीएसई प्रमुखांची चांगलीच कानउघाडणी केली. या प्रकरणात केलेल्या कार्यवाहीचा तपशील देण्याचे त्यानना बजाविण्यात आले आहे.