शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात आदिवासीवर अन्याय

By admin | Updated: May 21, 2015 01:28 IST

पारंपरिकरीतीने आदिवासींवर होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून २००६ मध्ये केंद्रसरकारने वनहक्क कायद्याची निर्मिती केली.

वडाळा (तु.): पारंपरिकरीतीने आदिवासींवर होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून २००६ मध्ये केंद्रसरकारने वनहक्क कायद्याची निर्मिती केली. मात्र प्रशासकीय पातळीवर वनहक्क कायद्याची अंमलबजावणी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे होत नसल्यामुळे आदिवासीवरील अन्याय दूर होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.आदिवासी व त्यांच्या सोबत असलेल्या इतर पारंपारिक निवासी यांचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास होण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६ व नियम २००८ या वनहक्क कायद्याची निर्मिती केली. त्यामुळे या वनहक्क कायद्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात २००९ पासून सामूहिक वनहक्क दावे कायद्यातील तरतुदीची पूर्तता करुन संबंधित उपविभागस्तरीय समितीकडे सादर करण्याला सुरुवात झाली. त्यात गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव व भद्रावती तालुक्यातील चिंचोली ही दोन दावे चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले दावे सादर केलेले असून २००९ मध्ये एकाच दिवशी संबंधित उपविभागस्तरीय समितीकडे सादर केले. त्यातील गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव येथील सामूहिक वनहक्क दावा मान्य करुन तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते त्या दाव्याचा अभिलेख ग्रामसभेच्या नावे वितरित करण्यात आला. मात्र भद्रावती तालुक्यातील चिंचोली येथील सामूहीक वनहक्क दावा तीन वर्ष उपविभागस्तरीय वनहक्क समिती वरोरा येथे प्रलंबित ठेवून ५ मार्च २०१३ रोजी समितीचे सभेत मान्य करुन अंतिम मंजुरीकरिता जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे पाठविण्यात आला. मात्र जिल्हास्तरीय वनहक्क समितीने दोन वर्षापासून प्रलंबित ठेवून अन्यायच केलेला आहे.वनहक्क दावे प्रलंबित ठेवून या अन्यायकारक, प्रवृत्तीची झळ भद्रावती तालुक्यातील चिंचोली बरोबरच वडाळा (तु.) घोसरी, सितारामपेठ, कोठेगाव, खुटवंडा, यासारख्या अनेक गावात वनहक्क कायद्यातील तरतुदीची पूर्तता करुन उपविभागस्तरीय वनहक्क समिती वरोरा यांच्याकडे सामूहिक वनहक्क दावे सादर केले. त्यातील वडाळा तु. येथील ग्रामस्थांनी केलेला सामूहिक वनहक्क दावा ५ मार्च २०१३ रोजी झालेल्या उपविभागीय समिती वरोराच्या सभेत अमान्य केल्याने समितीने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात वडाळा ग्रामसभेने जिल्हास्तरीय समितीकडे ४ मे २०१३ रोजी अपिल सादर केले. मात्र दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडून कुठलीही कार्यवाही केली नसल्याने अपिलचे प्रकरण प्रलंबित ठेवून ग्रामसभेवर अन्यायच केला आहे. त्यासोबतच तालुक्यातील घोसरी, सितारामपेठ, कोंढेगाव, खुटवंडा येथील सामूहिक वनहक्क दावे एक वर्षापासून उपविभागस्तरीय वनहक्क समिती वरोरा येथे प्रलंबित असल्याने एक प्रकारे प्रशासकीय पातळीवरुन दावे प्रलंबित ठेवून वनहक्क मागणीदार आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी समुदायावर अन्यायच केला जात असल्याची भावना गावागावात व्यक्त होत आहे. सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री असून याच जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहे. मुनगंटीवारची ही जन्मभूमी असल्याने सामूहिक वनहक्क दाव्यांच्या प्रक्रियेत लक्ष घालून मान्य करतील आणि आदिवासी जनतेवर होणारा पारंपारिक अन्याय दूर करतील, अशी जनतेची अपेक्षा आहे. (वार्ताहर)