शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

्रजटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी पालकमंत्र्यांच्या रडारवर

By admin | Updated: November 15, 2015 00:34 IST

चंद्रपूरकरांसाठी नेहमीची डोकेदुखी असलेली जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ...

गेट परिसरात झाली स्टँडिंग मिटिंग : अधिकारी-नागरिकांनी सुचविले उपाय, सादर केले प्रस्तावचंद्रपूर : चंद्रपूरकरांसाठी नेहमीची डोकेदुखी असलेली जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढकार घेत शनिवारी चक्क गेट परिसरातच नागरिक आणि अधिकाऱ्यांची स्टँडिंग मिटिंग घेतली. या बैठकीत नागरिकांचे प्रस्ताव ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक समिती गठित करण्याची घोषणा केली. एवढेच नाही तर नागरिकांनी सुचविलेल्या आराखड्यानुसार पहाणी करून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. तीन महिन्यांपूर्वीच ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात ‘मेक इन चंद्रपूर’ अंतर्गत नागरिक-अधिकाऱ्यांची बैठक घेवून शहराच्या दृष्टीने उपाययोजना ऐकून घेतल्या होत्या. त्यानंतर शनिवारी चक्क जटपुरा गेट परिसरात रस्त्याच्या कडेला अधिकारी-नागरिकांची बैठक घेऊन तात्काळ मार्ग काढण्यासाठी पाऊल उचलले. जटपुरा गेटवर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी व वाहतूक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी त्यांनी अधिकारी व शहरातील नागरिकांची समिती गठीत करण्याचा निर्णय या स्टँडिंग बैठकीत जाहीर केला. बैठकीला आमदार नाना शामकुळे, राजुराचे आमदार संजय धोटे, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, महापालिका आयुक्त सुधीर शंभरकर यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.जटपुरा गेटच्या खिडक्या तोडण्यासंदर्भात नागरिकांचे प्रस्ताव आले होते. त्यावर ना. मुनगंटीवार म्हणाले, जटपुरा गेट हा ऐतिहासिक वारसा असल्याने तो जपायला हवा. गेटला धक्काही न लावता वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. जटपुरा गेटची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथील आॅर्कालॉजिकल डायरेक्टर आॅफ जनरल यांना येत्या पंधरा दिवसात चंद्रपुरात पाचारण केले जाईल. त्यांच्याकडून गेटची पहाणी करून दुरूस्तीच्या दृष्टीने आणि शहरात प्रवेश करावयाच्या मार्गावरील किल्ल्याची फुटकी भींत पाडून मार्ग मोठा करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. यासोबत शहरातील पुरातत्व विभागाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या वास्तूंची पहाणीही त्यांच्याकडून करून या सर्व वास्तूंचे जतन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.वाहतूक कोंडीसाठी उपाययोजना सुचविणाऱ्या नागरिकांसह तज्ज्ञ नागरिकांची समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गठित करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. जटपुरा गेटवरील वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी ही समिती उपाययोजना सुचवेल, नागरिकांच्या सर्व सूचनांचा समितीने विचार करावा असे त्यांनी सांगितले. पुरातत्त्व विभागाच्या प्रमुखांना येत्या सोमवारीच पत्र लिहून चंद्रपूर भेटीवर येण्याची विनंती करणारे पत्र लिहिण्याची सूचनाही त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना केली. शक्य झाल्यास पुरातत्त्व विभागाच्या मंत्र्यांनाही भेटीसाठी विनंती करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. बसस्थानक ते रामाळा तलाव हा नवीन मार्ग निर्माण करणे तसेच रामगनर मार्ग एकेरी करून या मार्गाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतुद करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. वरोरा नाका चौकातील उड्डाण पुलावरील एक मार्ग २६ जानेवारीनंतर सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. बैठकीनंतर पालकमंत्री व अधिकाऱ्यांनी जटपुरा गेटची पाहणी केली. बैठकीस शहरातील नागरिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)