शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

७०० संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: June 26, 2015 01:12 IST

ग्रामपंचायतीचे प्रशासकीय काम व आॅनलाईन दाखले तयार करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी पद्धतीने संगणक परिचालकांची २०११ मध्ये भरती करण्यात आली.

नांदाफाटा : ग्रामपंचायतीचे प्रशासकीय काम व आॅनलाईन दाखले तयार करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी पद्धतीने संगणक परिचालकांची २०११ मध्ये भरती करण्यात आली. मात्र सदर कर्मचाऱ्यांचे मानधन अनियमित देण्यात येत असून काहींना पाच- पाच महिने मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंंचायतीमधून जन्म- मृत्यू, नमूना आठ, रहिवासी आदी दाखले आॅनलाईन देता यावे व कामकाजाचे आधुनिकीकरण व्हावे, या हेतुने या कर्मचाऱ्यांची प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नेमूणक केली.साधारणता चार हजार रुपये मानधनावर हे कर्मचारी काम करीत आहे. यातच नेमणूक करताना कालांतराने कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याचे लॉलीपापही या कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आले होते. आता पाच वर्ष लोटूनही कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीनेच काम करावे लागत आहे. काही महिन्याआधी राज्यभर संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आंदोेलने, उपोषणे व मोर्चा काढण्यात आला. यामध्ये कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेणे, नियमित मानधन, स्टेशनरी खर्चाचा बोझा न देणे, अतिरिक्त कामाचा भार वगळणे आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्या मान्य न झाल्याने जवळपास दोन ते तीन महिने काम बंद आंदोलनही करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा खासदार, आमदारांना निवेदनाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याबाबत संगणक परिचालकांनी मागणी केली. ही मागणी आश्वासनात विरली. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. आणि राज्यव्यापी संपही पुकारण्यात आला. तेव्हा २०१५ मध्ये सदर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत मानधन देण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतला. मात्र पाच- सहा महिने लोटूनही हे आश्वासन फोल ठरल्याच्या प्रतिक्रिया या कर्मचाऱ्यांना येत आहे. निवडणुकीपूर्वी काही राजकीय पुढाऱ्यांनी संगणक परिचालकांच्या प्रश्नांना सत्तेत आल्यानंतर न्याय देऊ असे सांगितले. मात्र त्यातही निराशाच दिसून येत आहे. केवळ आश्वासनेच पदरी पडत असल्याने या कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे.(वार्ताहर)