शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना शेतीच्या कामात वाघाचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST

भीतिपोटी अनेक शेतकरी त्यांच्याच शेताकडे फिरकायलाही तयार नाहीत. दरम्यान, या नरभक्षक वाघाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी  परिसरातील अनेक गावांतील शेतकरी तथा नागरिकांनी केली आहे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आलेवाही बिट कक्ष क्र.७०३ मध्ये येत असलेल्या खरकाडा जंगल परिसरात मंगळवारी रमेश वाघाडे या गुराख्यास वाघाने ठार केले.

ठळक मुद्देकामे खोळंबली : वाढोणा परिसरातील अनेक गावातील नागरिकात भीतीचे सावट

राजेश बारसागडेलोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा परिसरातील वाढोणा, आलेवाही, ऊश्राळ मेंढा, खरकाडा, आकापूर आदी गावांत नरभक्षक  वाघाचा  हैदोस सुरू असून, दोन गुरख्यांना ठार करून अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, जनावरांना वाघाने फस्त केले आहे. सद्यस्थितीत वाढोणा परिसरातील अनेक गावांत  शेतीचा हंगाम जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत तोंडाला मनुष्याच्या  व जनावरांच्या रक्ताचा वास लागलेला नरभक्षक वाघ शेतकऱ्यांच्या रोवणी हंगामात अडसर ठरत आहे. भीतिपोटी अनेक शेतकरी त्यांच्याच शेताकडे फिरकायलाही तयार नाहीत. दरम्यान, या नरभक्षक वाघाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी  परिसरातील अनेक गावांतील शेतकरी तथा नागरिकांनी केली आहे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.आलेवाही बिट कक्ष क्र.७०३ मध्ये येत असलेल्या खरकाडा जंगल परिसरात मंगळवारी रमेश वाघाडे या गुराख्यास वाघाने ठार केले. त्या अगोदर जवळील आकापूर येथील गुराख्यास रात्रीच्या सुमारास वाघाने मारल्याची घटना घडली होती. .या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्या व कित्येक जनावरांना या वाघाने ठार केले आहे. दोन्ही गुराख्यांना व विविध जनावरांना यमसदनी पाठविणारा नरभक्षक हा एकच पट्टेदार वाघ आहे, असे संबंधित गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. वाढोणा-ऊश्राळ मेंढा या गावांच्या मधोमध शेतशिवारांना लागून गोसेखुर्द कालवा गेलेला आहे. कालव्याच्या पाळीवर मोठमोठी झाडे तयार झाल्याने व झुडपी जंगल असल्याने, या परिसरात वाघाची वसाहत आहे, शिवाय रंगी तलावाच्या सभोवताल किरकोळ झुडपी जंगलाचा वेढा आहे आणि या वेढ्यासभोवताल वाढोणा, ऊश्राळ मेंढा, सावरगाव  खरकाडा, जीवनापूर आदी गावांतील नागरिकांचे शेत आहेत. रमेश वाघाडेला ज्या परिसरात वाघाने मारले, त्याच परिसरात अर्जुन सोनवाणे रा.खरकाडा, सदाशिव मडावी रा.जीवनापूर, गुलाब कुळमेथे रा. जीवनापूर, मार्कंडी कोमावर रा.वाढोणा, राजू कुळमेथे, उत्तम मेश्राम, रवि सहारे, रामदास निकुरे, सुभाष गजबे यांच्यासह आलेवाही, आकापूर, वाढोणा, खरकाडा, ऊश्राळ मेंढा, जीवनापूर आदी गावांतील अनेक शेतकऱ्यांची शेती आहेत, शिवाय रंगी तलाव शेजारीही ऊश्राळमेंढा व वाढोणा या गावांतील अनेक शेतकऱ्यांचे शेत आहे आणि सभोवताल जंगलाचा वेढा आहे. सद्यस्थितीत  शेतीतील रोवणीचा हंगाम जोरात सुरू आहे आणि परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. हा वाघ केव्हाही जंगल परिसरातून शेतात प्रवेश करू शकतो. त्यामुळे सर्व शेतकरी  स्वतःच्या शेतात जायला घाबरत आहेत. 

...आणि वाघ तिच्या मागे धावत आला

एकाच महिन्यात वाढोणा परिसरात दोन गावांतील दोन गुराख्यांना वाघाने ठार मारले. अनेक शेतकऱ्यांचे शेत खरकाडा जंगल परिसरात आहेत. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी घाबरलो आहोत. शेतात जाणे म्हणजे युद्धात गेल्यासारखे वाटू लागले आहे. या वाघाचा तात्काळ बंदोबस्त हवा आहे. मात्र वनविभागाने अजूनही कुठलीही उपाययोजना केली नाही.-अर्जुन गोपाला सोनवानेशेतकरी,खरकाडा.

 नागभीड तालुक्यातील वाढोणा परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतालगतच्या परिसरात वाघाने मागील १५ दिवसांत बराच धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांत भीतीचे सावट पसरले आहे. परिणामी, शेतीची कामे खोळंबली आहेत. वाघाचा कायम  बंदोबस्त करण्याबाबत खासदार अशोक नेते यांना कळविले आहे.     - होमदेव मेश्राम, माजी तालुकाध्यक्ष, भाजपा, नागभीड.

 

टॅग्स :Tigerवाघagricultureशेती