शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! गळ्यात शिकारीचा फास अडकलेला वाघ जंगलात; वन विभागाची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 09:12 IST

, पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन

- प्रवीण खिरटकरवरोरा (जि. चंद्रपूर) : जंगलात शिकारीकरिता लावलेल्या फासात चक्क एक वाघ अडकला. परंतु ताकदीने वाघ पुढे निघाल्याने तो फास त्याच्या गळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन दिवसांपासून वाघाच्या गळ्यात फास असल्याने वनविभागाची धाकधूक वाढली आहे. अधिक दिवस फास वाघाच्या गळ्यात राहिल्यास त्याला शिकार करता येणार नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वरोरा वनपरिक्षेत्रातील पळसगाव परिसरात काही दिवसांपासून वाघाचे वास्तव्य वाढले आहे. तीन दिवसांपूर्वी वन कर्मचाऱ्यास या भागात रक्त आढळून आले. वनविभागाच्या कॅमेऱ्यात वाघाच्या गळ्यात पट्टा असल्याचे दिसून आले. तो पट्टा बांधलेला असावा, असा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करून वनविभागाने संभ्रम वाढविला. याबाबतची नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, अधिक चौकशी केली असता वन्यप्राण्यांच्या शिकारीकरिता लावलेल्या फासामध्ये हा वाघ अडकल्याचे निष्पन्न झाले.वाघाच्या गळ्यात पट्टा नसून तो फास आहे, ही बाब वन विभागाच्या लक्षात येताच मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली आहे. वाघाच्या गळ्यात असलेला फास जर घट्ट झाला, तर त्याला काही खाता येणार नाही. शिकारही करता येणार नाही. असाच तीन-चार दिवस राहिल्यास भुकेने मृत्युमुखी पडू शकतो. तो पट्टेदार वाघ मादी असून वयस्क असल्याची माहिती आहे.बकरी पिंजऱ्यातून पळालीवाघ पिंजऱ्यात यावा याकरिता पिंजऱ्यात बकरी बांधली होती. रात्रभर वाघ पिंजऱ्याकडे फिरकला नाही. सकाळी वन कर्मचाऱ्याने बकरीला पाणी पिण्याकरिता सोडले असता बकरी पळून गेली. मग बकरीची शोधमोहीम वनविभागाचे कर्मचारी करू लागले. अथक परिश्रमानंतर पाच ते सहा तासांनी बकरी वन कर्मचाऱ्यांना मिळाली.तो फास नायलाॅनचातीन दिवसांपूर्वी एका वाघाच्या गळ्यात फास अडकल्याचे लक्षात आले. त्या वाघाचा शोध वरोरा वनविभागाची टीम घेत आहे. वाघाच्या गळ्यात असलेला फास हा नायलाॅनचा आहे. यामुळे वाघाला जीविताला धोका नाही. वाघ दिसताच त्याला बेशुद्ध करून त्याच्या गळ्यातील फास काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.- एन. आर. प्रवीण,मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर