शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात होणार एलआयसीच्या तीन सॅटेलाईट ब्रँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 15:54 IST

ग्राहकांना आता विमा पॉलिसीचे प्रिमियम भरण्यासह अनेक कामे करण्यासाठी तालुकास्तरावर सुविधा व्हावी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात चिमूरसह सिंदेवाही, गोंडपिपरी व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे एलआयसीच्या सॅटेलाईट ब्रँचला नुकतीच मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देचिमूर, सिंदेवाही, गोंडपिपरी व वडसाचा समावेशलाखो विमा धारकांना होणार सुविधा

राजकुमार चुनारकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘योगक्षेम, वहाम्यहम’, हे घोषवाक्य घेत ‘जीवन के साथ भी,और जीवन के बाद भी’ अशी संकल्पना असलेल्या भारतीय जीवन विमा कंपनीने पूर्ण देशात आपले विम्याचे ग्राहक तयार केले आहेत. आजघडीला लाखो नागरिकांना विमा कंपनीने जीवन सुरक्षाचे कवच पुरविले आहे. याच ग्राहकांना आता विमा पॉलिसीचे प्रिमियम भरण्यासह अनेक कामे करण्यासाठी तालुकास्तरावर सुविधा व्हावी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात चिमूरसह सिंदेवाही, गोंडपिपरी व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे एलआयसीच्या सॅटेलाईट ब्रँचला नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे लाखो ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.भारतीय जीवन विम्यामध्ये कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाविरुद्ध आयुर्विमा हे संरक्षण असते, विमाधारकाच्या मृत्यूपश्चात कुटूंबप्रमुखावर अवलंबून असलेल्या व्यक्तीचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे आणि आर्थिकदृष्टया त्यांचे जीवन बिघडणार नाही, यासाठी एलआयसी विमाधारकाच्या वारसास ठरलेली रक्कम देते व त्या परिवाराची आर्थिक घडी बसवते. जिल्हा स्तरावर एलआयसीच्या अनेक शाखा ग्राहकांच्या सेवेत आहेत.ग्रामीण भागातील ग्राहकांना विमा सेवेच्या कामासाठी अभिकर्ता यांच्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळेच अनेक नागरिकांच्या विमा पॉलिसी बंद पडल्या जातात व त्यांना अकस्मात घडलेल्या घटनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील विमाधारकांना त्यांच्या पॉलिसीचे प्रिमियम भरणे व इतर कामे त्यांच्या गावाजवळ करता यावे म्हणून एलआयसीने आता तालुकास्तरावर एलआयसीच्या सॅटेलाईट ब्रँच सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे.सॅटेलाईट ब्रँचमध्ये या मिळणार सुविधासॅटेलाईट ब्रँचमधून त्यांच्या इतर ब्रँचसारखेच पॉलिसीचे प्रिमियम भरणे, पॉलिसीवर कर्ज, बंद पॉलिसी पुनर्जिवीत करणे, पॉलिसीची सध्याची स्थिती माहिती करणे, नवीन पॉलिसी काढणे यासह अनेक कामे या सॅटेलाईट ब्रँचमध्ये करण्यात येणार आहेत.ग्रामीण भागातील विमाधारकांना सुविधा व्हावी म्हणून एलआयसी केंद्रीय कार्यालयाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील चार सेटेलाईट ब्रँचला नुकतीच मान्यता दिली असून केंद्रीय कार्यालयाकडून कार्यवाही सुरू आहे.-मुकेशचंद्र जोशीसिनीअर विभागीय व्यवस्थापक, नागपूर.

टॅग्स :Governmentसरकार