तेलंगणातून येणारा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:50+5:30

गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सिमा लागून आहे. सीमेवरील भागात कायदा व सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी धाबा, लाठी सह गोंडपिपरी पोलिसांवर आहे. या नक्षलग्रस्त व संवेदनशील परिसरात छुप्या मार्गाने दारूची तस्करी होत असते. धाबा, लाठी, गोंडपिपरी परिसरातील दारूविक्रीविरुद्ध कंबर कसली आहे.

Stocks of liquor coming from Telangana confiscated | तेलंगणातून येणारा दारूसाठा जप्त

तेलंगणातून येणारा दारूसाठा जप्त

ठळक मुद्देआरोपीवर गुन्हा : गोंडपिपरी व धाबा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर : तेलंगणातून दारुसाठा येत असल्याच्या गुप्त माहितीवरुन गोंडपिपरी धाबारोडवील धामनपेठ येथे नाकाबंदी करुन चारचाकी वाहनातून ६८ हजार रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. या प्रकरणी नितीन बाबुराव अलगमकर (२५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंडपिपरी तालुक्याला तेलंगणा राज्याची सिमा लागून आहे. सीमेवरील भागात कायदा व सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी धाबा, लाठी सह गोंडपिपरी पोलिसांवर आहे. या नक्षलग्रस्त व संवेदनशील परिसरात छुप्या मार्गाने दारूची तस्करी होत असते. धाबा, लाठी, गोंडपिपरी परिसरातील दारूविक्रीविरुद्ध कंबर कसली आहे. शुक्रवारी तेलंगनातून दारुची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरुन गोंडपिपरी पोलीस स्टेशन, धाबा पोलीस स्टेशन यांनी धामनपेठ येथे नाकाबंदी करुन एम एच ३४ ए. ए ५२९४ या वाहनातून ६८ हजार रुपयांची विदेशी दारु जप्त केली.
ही कारवाई ठाणेदार संदीप धोबे, ठाणेदार सुशील धोपटे यांच्या मार्गर्शनात नासिर सय्यद, शांताराम पाल, पुणेशवर कुळमेथे यांच्यासह पोलिसांनी केली.

Web Title: Stocks of liquor coming from Telangana confiscated