शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २२६ गावांमध्ये किटकनाशकांची फवारणी

By admin | Updated: June 26, 2015 01:12 IST

हिवतापाकरिता संवेदनशील असलेल्या २२६ गावांत कीटनाशक फवारणी करण्यात येणार आहे.

चंद्रपूर : हिवतापाकरिता संवेदनशील असलेल्या २२६ गावांत कीटनाशक फवारणी करण्यात येणार आहे. यासाठी २२ पथके तयार करण्यात आली आहेत.आरोग्य सभापती ईश्वर मेश्राम यांनी अलिकडेच बैठक घेऊन हिवताप विभागाचा आढावा घेतला. कीटनाशक फवारणी योग्य प्रमाणात होण्याकरिता वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता देखरेख ठेवणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचाऱ्यांनी कीटनाशकांची १०० टक्के फवारणी प्रत्येक घराघरांतून होण्याकरिता फवारणीचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे. ज्या गावात कीटनाशक फवारणी होणारे आहे. तेथील नागरिकांनी आपल्या घरात फवारणी करुन घ्यावी. डासांची मादी तिच्या वजनाच्या दीडपट रक्त शोषण करते. रक्त शोषण केल्यानंतर उडून जाऊ शकत नसल्याने घेतलेल्या रक्ताचे पचन होईपर्यंत भिंतीवरच राहते. त्यामुळे भिंतीला लागलेला पावडर डासांच्या पायाला लागून डास मरतात. त्यामुळे घरामध्ये १०० टक्के फवारणी करुन घेणे आवश्यक आहे. डास अंधाऱ्या खोलीत व सूर्यप्रकाश नसलेल्या खोल्यात लपून बसतात. त्यामुळे अशा अडचणीच्या जागी १०० टक्के फवारणी करुन घ्यावी. कीटकनाशकाची फवारणी झाल्यानंतर अडीच ते तीन महिने पावडरचा भिंतीवर परिणाम राहत असल्याने त्या सारवू नये. येणाऱ्या फवारणी पथकाला पूर्णपणे सहकार्य करुन घरे योग्यप्रकारे फवारुन घेतल्यास हिवताप व इतर आजारावर नियंत्रण ठेवता येते. (शहर प्रतिनिधी)