शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:00 IST

कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लादले. परिणामी अत्यावश्यक सेवेतील वाहनाला परवानगी होती. त्यातच कोरोनाच्या दहशतीने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही अत्यल्प होती. त्यामुळे अपघाताची संख्या कमी झाली होती. परंतु, मागील दोन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध हटविले आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दारु सुरु झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाहतुकीवर निर्बंध असल्याने अपघाताचे प्रमाण शुन्यावर आले होते. मात्र दुसरी लाट ओसरायला लागल्याने प्रशासनाने निर्बंध हटविले. त्यामुळे अपघाताच्या संख्येतही वाढ झाली आहे. पूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघाताचे एक किंवा दोन रुग्ण पेशंट यायचे. परंतु, आता ही आकडेवारी वाढली असून दिवसाला चार ते पाचजण येत असल्याचे चित्र आहे.कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लादले. परिणामी अत्यावश्यक सेवेतील वाहनाला परवानगी होती. त्यातच कोरोनाच्या दहशतीने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही अत्यल्प होती. त्यामुळे अपघाताची संख्या कमी झाली होती. परंतु, मागील दोन महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध हटविले आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दारु सुरु झाली आहे. परंतु, कोरोनामुळे ब्रेथ ॲनेलायझरच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. परिणामी अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथेसुद्धा अपघाताचे रुग्ण येण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.

दारू हेही एक कारण

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ मध्ये दारुबंदी करण्यात आली होती. मात्र सहा वर्षानंतर जुलै २०२१ मध्ये दारुबंदी हटविण्यात आली. त्यातच कोरोनामुळे ब्रेथ ॲनेलायझरच्या वापरावर पोलिसांना निर्बंध लादन्यात आले आहे. त्यामुळे दारु पिऊन वाहन चालविणाऱ्याचे चांगलेच फावत आहे. त्यामुळसुद्धा अपघाताची संख्या वाढत चालली आहे.

 

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटल