शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा कहर सुरू असतानाही सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारपर्यंत ५५१ रूग्ण कोरोना बाधित झाल्याचे उघडकीस आल्याने प्रशासकीय वर्तुळातही आता चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत २४ हजार १४३ संशयीत व्यक्तींचे नमूने घेतले. यातील २२ हजार ८५५ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यापासून बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

ठळक मुद्देनिष्काळजीपणा महागात पडणार : सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून जीवनावश्यक दुकानांसह बहुतांश दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवागनी दिली. १ ते ३१ जुलैपर्यंत कलम १४४ लागू करून जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला. मात्र, प्रशासनाने सातत्याने सूचना देवूनही नागरिकांकडून जमावबंदी धाब्यावर ठेवल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. सहा फुटाचे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यातही नागरिक कुचराई करीत असल्याने कोरोनाच्या उद्रेकाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारपर्यंत ५५१ रूग्ण कोरोना बाधित झाल्याचे उघडकीस आल्याने प्रशासकीय वर्तुळातही आता चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत २४ हजार १४३ संशयीत व्यक्तींचे नमूने घेतले. यातील २२ हजार ८५५ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यापासून बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जुलै महिन्यात दररोज सुमारे १५ ते १८ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची नोंद आहे. कोरोनाचा कहर असा सुरू राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जावू शकते, ही शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपयायोजना सुरू केल्या. वेगवगळ्या माध्यमांतून जागृती सुरू असूनही नागरिक सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करीत आहेत.दुकानांसमोरील सॅनिटायझर हटविलेदुकाने सुरू करण्यास परवानगी दिल्याने आर्थिक व्यवहार हळूहळू रूळावर येत आहेत. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाही जिल्ह्यात जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्यास एक तासांचा जादा कालावधी देण्यात आला. ग्राहक दुकानात आल्यास आधी हात धुण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. लॉकडाऊन काळात बहुतांश दुकानदारांनी या सूचनांचे पालन केले होते. मात्र, आता बºयाच व्यावसायिकांनी स्वत:च्या दुकानासमोर सॅनिटायझर बॉटल हटविल्याचे दिसून येत आहे.फक्त मास्क न वापरणाऱ्यांविरूद्धच कारवाईसार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांविरूद्ध प्रशासनाकडून २०० रूपयांचा दंड आकारला जात आहे. संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८८, २६९, २७०, २७१ अन्वये कारवाई सुरू आहे. मात्र,चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील तालुकास्थळावरील मुख्य बाजारपेठ, वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येत असतानाही प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेणे सुरू असल्याचा आरोप काही जागरूक नागरिकांनी केला आहे. रविवारी चंद्रपूर शहरातील बाजार सुरू होता. या बाजारातही प्रचंड गर्दी दिसून आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या