शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लाकडांसोबत वन्यप्राण्यांची तस्करी

By admin | Updated: June 12, 2014 23:59 IST

मध्यचांदा वनविकास महामंडळ सध्या गैरप्रकाराबाबत चांगलेच चर्चेत आले आहे. या महामंडळातील अवैध वृक्षतोडीचा प्रकाराने खळबळ उडवून दिली असतानाच आता दुसरा गंभीर प्रकार समोर आला आहे.

वनविकास महामंडाळातील प्रकार: प्रकार दडपण्याचा अधिकाऱ्यांकडून प्रयत्नसुरेश रंगारी - कोठारीमध्यचांदा वनविकास महामंडळ सध्या गैरप्रकाराबाबत चांगलेच चर्चेत आले आहे. या महामंडळातील अवैध वृक्षतोडीचा प्रकाराने खळबळ उडवून दिली असतानाच आता दुसरा गंभीर प्रकार समोर आला आहे. सागवानाच्या तस्करीसोबत चक्क वन्यप्राण्यांचीही तस्करी केली जात आहे. मध्यचांदा ‘वनविकास महामंडळात अवैध वृक्षतोडीचे ग्रहण’ असे वृत्त काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच वनविभागात खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यात १० जूनला प्रभारी सहाय्यक व्यवस्थापक तथा झरणचे वनाधिकारी डी.बी. पूलगमकर यांच्यासह वनकर्मचारी व फिरते पथकाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मोहिम राबविली. मात्र त्यात त्यांना केवळ सहा थुट आढळल्याचे सांगण्यात आले. यावरुन वनविकास महामंडळ अवैध वृक्षतोडीबाबत अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, वृक्षतोड करणारे तृणभक्षक प्राण्यांची शिकारही करीत असतात. शिकार केलेले हे वन्यप्राणी सागवानाच्या लाकडांसोबत बांधून त्याची वाहतूक केली जात आहे. हा प्रकार काहींच्या लक्षात आला. मात्र वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब माहित होऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.१० जून रोजी राबविलेल्या मोहिमेत कोठारीनजीक तोहगाव रोडवर कक्ष क्र. १ मध्ये सागवानाची चोरटी वाहतूक करताना कर्मचाऱ्यांना काही युवक दिसले. कर्मचाऱ्यांना पाहाताच त्यांनी सागवानाचे ओंडके जागेवरच फेकून पसार झाले. यावेळी देखील सागवानासोबत वन्यप्राण्यांची शिकार करून वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पळून गेलेल्या युवकांचा शोध घेण्याची तसदीही वनाधिकाऱ्यांनी घेतली नाही.झरण वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. १,२,३, ८०, ८१, ८२ मध्ये प्रचंड प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल झाली आहे. यात ३०० ते ४०० वृक्षांची कटाई करण्यात आली आहे. त्यात महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोबतच वन्यप्राण्यांच्या शिकारीतही वाढ झाल्याचा प्रकार दिसून आला मात्र वनाधिकारी काहीही झाले नाही, कुठेही वृक्षतोड नाही, असे वरिष्ठांना सांगत झालेला प्रकार दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यास वरिष्ठ अधिकारीही सहकार्य करीत आहेत.