शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

पावरप्लॉन्टच्या प्रदूषणाविरुद्ध शिवसेनेचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2015 01:51 IST

देशात प्रदूषणात अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक प्रदूषणाने हैरान झाले आहेत.

चिमूर: देशात प्रदूषणात अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक प्रदूषणाने हैरान झाले आहेत. मात्र याच जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मागील आठ वर्षापासून सुरु असलेल्या शारदा अंबिका पावर प्लॅन्टच्या धुरामुळे व राखेच्या कणामुळे चिमूरकरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. सोबतच या प्लॅन्टसाठी वापरण्यात येणारे पाणीही चिमूरकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यातून पळविले जात आहे. त्यामुळे या पॉवर प्लॅन्टवर प्रदूषण मंडळाने कारवाई करुन प्लॅन्ट बंद करण्यासाठी चिमूर तालुका शिवसेनेने एल्गार पुकारला आहे.मागील आठ वर्षांपासून चिमूर येथे शारदा अंबिका पॉवर प्लान्ट सुरु आहे. या पावर प्लॉन्टसाठी वापरण्यात येणारा कोंडा, कुटार व इतर जळावू साहित्याद्वारे वीज निर्मिती केली जात आहे. मात्र पॉवर प्लॉन्ट सुरु करण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषाचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे चिमूर परिसरातील नागरिकांचे आरोग्य राखेच्या कणामुळे व चिमणीतून निघणाऱ्या धुरामुळे धोक्यात आले आहे. परिसरातील शेतीसुद्धा धुरामुळे धोक्यात आले आहे. परिसरातील शेतीवर सुद्धा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करत चिमूरला लागून असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांवरसुद्धा परिणाम होत आहे. त्यामुळे या पॉवर प्लॅॅन्ट बंद करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख गजानन बुटले यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.पॉवरप्लॅन्ट व्यवस्थापनाकडून स्थानिक मजुराऐवजी परप्रांतीय मजुरांना रोजगार देण्यात येत आहे. मजुरांच्या पगारातून पीएफ कापला जात नाही. तसेच मजुरांना सुरक्षा साधने दिली नाही. मजुरांच्या आरोग्याची कुठलीही व्यवस्था नसून डॉक्टरांची नियुक्ती केली नाही. शेतकऱ्यांच्या टाकाऊ मालाला भाव दिल्या जात नाही. तसेच चिमूरकरांना पिण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्यावर या प्लॅन्टच्या धुरांचा विपरीत परिणाम होवून चिमूरकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.या पॉवर प्लॅन्टमुळे चिमूरकरांच्या आरोग्यासह परिसरातील शेती धोक्यात आली आहे. तेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करुन प्लॅन्टला कुलूप ठोकून बंद करण्याची मागणी आहे. पंधरा दिवसात प्लॉन्टवर कारवाई केली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा गजानन बुटके यांनी दिला. पत्रकार परिषदेला उपशिवसेना तालुका प्रमुख सुधीर जुमडे, सचिन पचारे, उमेश हिंगे, भास्कर मांडवकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)