शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

सावलीचा पशुसंवर्धन विभाग वाऱ्यावर

By admin | Updated: January 29, 2015 23:04 IST

सावली पंचायतीतील पशुसंवर्धन विभागांतर्गत तालुक्यात १४ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित आहेत. मात्र १० वर्षांपासून येथे पशुधन विकास अधिकारीच नसल्याने तालुक्यात असलेल्या पशुवैद्यकीय

उपरी : सावली पंचायतीतील पशुसंवर्धन विभागांतर्गत तालुक्यात १४ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित आहेत. मात्र १० वर्षांपासून येथे पशुधन विकास अधिकारीच नसल्याने तालुक्यात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. परिणामी पशुपालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सावली पंचायत समितीअंतर्गत तालुक्यातील उपरी येथे श्रेणी-१, बोथली येथे श्रेणी-१, पशुवैद्यकीय दवाखाने असून येथे पशुधन विकास अधिकारी पद मंजूर असून उपरी येथील आठ वर्षांपासून तर बोथली येथील तीन वर्षांपासून पद रिक्त आहे. तालुक्यातील श्रेणी-२ मध्ये सावली, लोंढोली, सामदा, निमगाव, विहीरगाव, व्याहाड (बुज), पाथरी, निफंद्रा, पालेबारसा, जिबगाव, चिचबोडी, केरोडा येथील पशुवैद्यकीय दवाखाने येतात. यामधील अनेक दवाखान्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी वर्गाकडून पशुंना उपचार मिळत नसल्याची माहिती आहे. हे अधिकारी गावात अचानक येत असल्याने अनेक पशुपालक त्यांना हे गुरांचे डॉक्टर म्हणून ओळखतही नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा पशुपालकाशी संपर्क नसल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील काही गावे जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी ग्रामपंचायतीचा ठराव घेवून जोडली आहेत.सावली पंचायत समितीतील पशु संवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी (विस्तार) नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. पं.स. अंतर्गत येणाऱ्या पशु वैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कुणाचीही देखरेख व नियंत्रण नसल्याने रामभरोसे कारभार सुरू आहे. मागील दहा वर्षापासून सावली पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचा कारभार मूल पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी अतिरिक्त कार्यभार म्हणून सांभाळत आहे. अतिरिक्त कार्यभार सांभाळताना सावली पंचायत समितीमधील १४ पशू वैद्यकिय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवताना सदर अधिकाऱ्याची कसरत होत आहे. त्यामुळे पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाकडून मिळणाऱ्या लाभापासून पशुपालकांना वंचित रहावे लागत आहे. अनेकदा महत्वाची माहितीदेखील मिळत नाही. त्यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शासनाने सावली पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पद तातडीने भरून पशुपालकांसाठी चांगली सेवा उपलब्ध करून द्यावी, यासाठी लोक प्रतिनिधींनी प्रयत्न करावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)