शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात घोळ

By admin | Updated: November 14, 2015 01:19 IST

वरोरा तालुक्यातील भटाळा येथील पोषण आहारात घोळ झाल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राहुल गौरकार यांनी केला आहे.

कारवाईची मागणी : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे केली तक्रारचंद्रपूर : वरोरा तालुक्यातील भटाळा येथील पोषण आहारात घोळ झाल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राहुल गौरकार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे.भटाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सभा घेण्यात आली. त्यात तेल १.३३.११४ कि. ग्रॅम ऐवजी १.१०.००० कि.ग्रॅम, तिखट ०.३४.८६४ कि.ग्रॅम ऐवजी ०.२६.००० कि.ग्रॅम, चना १.२३.०० कि.ग्रॅम ऐवजी ०.८३.२० कि.ग्रॅम, असा साठा कमी आढळून आला तर तांदुळ व इतर साहित्य आणि वटाणा १.७५.००० कि.ग्रॅम शिल्लक असूनही त्याची प्रपत्र बी.मध्ये नोंद घेण्यात आलेली नाही. शालेय पोषण आहारात घोटाळा करण्यात आला असल्याची बाब यावरुन उघड झाली असून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शाळा व्यवस्था समितीचे उपाध्यक्ष राहुल पवन गौरकार यांनी केली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पोषण आहार मोजण्याकरिता शासनाने दिलेला वजन काटा हा दोन वर्षांपासून बंद असूनसुद्धा त्यांच्याकडे पोषण आहारचे रेकॉर्ड व पोषण आहाराचे साहित्य देण्याचे काम आहे. त्यांनी कानाडोळा करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वजन काट्याची मागणी केली नाही. कारण त्यांना धान्याची व इतर सामानाची अफरातफर करायची होती, असे गौरकार यांनी म्हटले आहे. यामध्ये संबंधित शिक्षिका तसेच मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर देत आहेत. विद्यार्थ्यांकरिता शासन पोषण आहार वाढवून देत आहे. मात्र यामध्ये भ्रष्टाचार करुन त्यांना योग्य असा आहार मिळत नाही. त्याकरिता संबंधितांना विचारणा करावी व योग्य कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)