शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

गोवरी परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ

By admin | Updated: January 27, 2015 23:32 IST

शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत रानडुकरांचे कळप धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. एका रात्रीतून शेतात उभे असलेले पीक नष्ट होत

गोवरी : शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत रानडुकरांचे कळप धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. एका रात्रीतून शेतात उभे असलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे बळीराजा पुरता खचला असून आर्थिक संकटात सापडला आहे.राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेस्टर्न कोल्डफील्डच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा उत्खननानंतर निघालेली माती व त्यावर दिवसेंदिवस वाढणारे झुडुपी जंगल यामुळे याठिकाणी रानडुकरांचे कळप मोठ्या प्रमाणात आढळतात. वेकोलिगत शेतकऱ्यांच्या शेती आहे. शेतात कापूस, तूर, हरभरा, गहू आदी पीक घेतले जात. यावर्षी निसर्गाचा लहरीपणा व शेतमालाच्या दरवाढी संदर्भात मायबाप सरकारने दाखविलेली उदासिनता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हादरुन गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस झाला. निसर्गाने ऐनवेळी दगा दिल्याने शेतकऱ्यांनी कशीबशी शेती पिकविली. दुबार- तिबार पेरणी करून शेतीवर अतोनात खर्च केला. मात्र उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, चिंचोली, बाबापूर परिसरात वेकोलिने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमााणात झुडपी जंगलामुळे रानडुकरांचे कळप आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. वेकोलिने मातीच्या ढिगाऱ्यावरील झुडपी जंगल नष्ट करावे, अशी मागणी अनेकदा गावकऱ्यांनी वेकोलिकडे केली होती. मात्र वेकोलि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यावर व्यापलेले झुडपी जंगल दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा नाहक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. रानडुकरांमुळे बळीराजा वैतागला आहे. त्यामुळे वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गोवरी येथील शेतकरी नामदेव जुनघरी, नामदेव देवाळकर, मारोती लोहे, भास्कर जुनघरी, भाऊराव रणदिवे, प्रमोद लांडे, सुनील देवाळकर यांनी केली आहे. (वार्ताहर)