शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

३१ ऑगस्टपर्यंतच्या जमावबंदीत दुकानदारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू केली. या कालावधीत आंतरराज्य, आंतर जिल्हा, प्रवास बंद राहतील. शाळा, महाविद्यालय ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ म्हणजे एक तास वाढविण्यात आली. हॉटेल्समधून पार्सल सेवा सुरू राहिल.

ठळक मुद्देकलम १४४ लागू । अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर निघण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू केली. या कालावधीत आंतरराज्य, आंतर जिल्हा, प्रवास बंद राहतील. शाळा, महाविद्यालय ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ म्हणजे एक तास वाढविण्यात आली. हॉटेल्समधून पार्सल सेवा सुरू राहिल. लग्न समारंभ तसेच अंत्यविधीला केवळ ५० व्यक्ती उपस्थित राहण्यास परवानगी आहे.परराज्यात, राज्यतंर्गत (चंद्रपूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात) प्रवासाकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागेल. परवानगीशिवाय नागरिकांनी जिल्ह्याबाहेर, परराज्य व परजिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. प्रवास केल्यानंतर १४ दिवस संस्थात्मक अलगीकरण किंवा गृह अलगीकरणात राहावे लागेल. अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी, अधिकारी व संबंधित व्यक्तींशिवास इतर व्यक्तींना रात्री ९ ते सकाळी ५ वाजतापर्यंत प्रतिबंध सार्वजनिक ठिकाणी निघता येणार नाही. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येता येणार नाही.जीवनावश्यक दुकाने सुरूअत्यावश्यक किराणा सामान, दुग्ध, दुग्धोत्पादन फळे व भाजीपाला, पार्सल स्वरूपात काऊंटर तसेच इतर मार्गांनी विक्री, वितरण व वाहतूक करण्यास परवानगी राहील. जीवनावश्यक खाद्यपदार्थ किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतूक, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस मासे बेकरी, पशुखाद्याची किरकोळ विक्री सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील.कृषी दुकानांनाही परवानगीकृषी, कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी, बाजार विशेषत: कापूस, तूर व धान खरेदी, विक्री आस्थापना, दुकाने सुरू ठेवण्यास परवागनी देण्यात आली. उत्पादन व पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग, आस्थापना व दुकाने सोमवारी ते रविवारी या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजता या वेळेत सुरू राहतील.बाहेरचे कामगार आणण्यास प्रतिबंधसर्व प्रकारचे शहरी व ग्रामीण भागातील औद्योगिक आस्थापना,वसाहती, युनिट बांधकाम सुरू राहतील. परंतु बांधकाम कामगाराला बाहेरून आणण्यास परवानगी नाही.१०० कर्मचारी उपस्थितीसर्व शासकीय, निमशासकीय महामंडळ कार्यालय १०० टक्के कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजमधील कार्यालय, कर्मचारी अध्यापन व्यतिरिक्त ई-लर्निंग कन्टेन्ट, उत्तरपत्रिकांची तपासणी,निकालपत्र संबंधित कार्यवाही करण्याकरिता उपस्थितीला परवानगी आहे.जिम्नॅस्टिक्सला मुभामैदानी बिगर संघीय खेळ जसे गोल्फ कोर्स, आउटडोर फायरिंग रेंज, जिम्नॅस्टिक्स, टेनिस, बॅडमिंटन आणि मल्लखांब यासारख्या क्रीडांना ५ ऑगस्टपासून सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. याशिवाय सलून, स्पा, बार्बर शॉप, ब्युटी पार्लर, केस कर्तनालये सायकांळी ६ वाजेपर्यंत सुरु राहतील.मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्समॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजता या वेळेत सुरू राहतील. मात्र कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, रेस्टॉरंट सुरू ठेवता येणार नाही. रेस्टॉरंट किचनमधून होम डिलिव्हरी सुरू ठेवता येतील.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या