शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांत चार हजार ८१९ क्विंटल खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

मागील वर्षी आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा जास्त भाव देण्यात आल्याने आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाने प्राधिकृत केलेल्या सोसायटयांकडे धान विक्रीसाठी चांगलाच कल वाढला होता. बहुसंख्य शेतकºयांनी या सोसायटया आणि पणनमहासंघाच्या केंद्रांवरच धानाची विक्री केली होती. मागील वर्षी नागभीड तालुक्यात आठ आदिवासी सोसाटया व दोन पणन महासंघाच्या केंद्रांमार्फत धान खरेदी करण्यात आली होती. 

ठळक मुद्देबाजार समितीत धानाची आवक वाढली, समितीच्या आवारात वाहनांची गर्दी

  घनश्याम नवघडे    लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड कृउबासमध्ये धानाची आवक चांगलीच वाढली आहे. या बाजार समितीत गेल्या पाच दिवसात चार हजार ८१९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. कृऊबासमध्येही धानाचे भाव वाढले आहेत. मागील आठवडयात धानाचा भाव २ हजार ४०० रूपयांपर्यंत पोहचला होता. आता या भावात काही प्रमाणात घसरण झाली आहे. उच्च प्रतीच्या धानाला २ हजार ३०० रूपयापर्यंत दर आहे. मात्र शेतकºयांचा धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कल असल्याचे दिसून आहे.मागील वर्षी आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा जास्त भाव देण्यात आल्याने आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाने प्राधिकृत केलेल्या सोसायटयांकडे धान विक्रीसाठी चांगलाच कल वाढला होता. बहुसंख्य शेतकºयांनी या सोसायटया आणि पणनमहासंघाच्या केंद्रांवरच धानाची विक्री केली होती. मागील वर्षी नागभीड तालुक्यात आठ आदिवासी सोसाटया व दोन पणन महासंघाच्या केंद्रांमार्फत धान खरेदी करण्यात आली होती. आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून बोनससह २ हजार ५५० रूपयांपर्यंत भाव मिळत असल्याने आणि बाजार समितीत २ हजार २०० रूपयांपर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकºयांनी कृउबासकडे जवळपास पाठ फिरवल्यासारखेच चित्र होते. मात्र यावर्षी परिस्थिती उलट आहे.बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार ५ डिसेंबरला १०५६.८१ क्विंटल , ७ डिसेंबरला १ हजार १९२ क्विंटल , ९ डिसेंबरला ५४० क्विंटल,१० डिसेंबरला ८०० क्विंटल आणि ११ डिसेंबरला १ हजार २३१ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड