शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

प्र.के. अत्रेंच्या भाषणाने चेतली होती मने

By admin | Updated: May 1, 2015 01:09 IST

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान फार मोठे नसले तरी सीपी अँड बेरारचा काळ ....

गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूरचंद्रपूर: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान फार मोठे नसले तरी सीपी अँड बेरारचा काळ अनुभवणाऱ्या आंध्र-महाराष्ट्र सीमेवरील या जिल्ह्याने उपक्षेची धग मात्र अनुभवली होती. या धगीतूनच वेगळ्या विदर्भ राज्यनिर्मितीच्या बाजूने या जिल्ह्याची मानसिकता होती. मात्र नंतरच्या काळात संंयुक्त महाराष्ट्राच्या पाठीशी चंद्रपूर जिल्ह्यातून जनमत उभे झाले. विशेष म्हणजे, आचार्य प्र. के. अत्रे यांच्यासारख्यांच्या भाषणांनी येथील लोकांची मने चेतविण्याचे काम केले होते.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी असलेल्यापैकी बहुतेक जण आता हयात नाहीत. केवळ बोटावर मोजण्याएवढी मंडळी आता हयात असली तरी अनेकांच्या आठवणी धुसर झाल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रिपब्लिकन पार्टी हा महत्वाचा घटक पक्ष होता. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आंदोलनाच्या निमीत्ताने भाई डांगे, एस.एम. जोशी, उद्धवराव पाटील आदी प्रभुतींची नेहमी ये-जा असायची. बॅरिष्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम केले. दादासाहेब गायकवाड यांचे त्यांना सहकार्य असायचे. चंद्रपूर जिल्ह्यातील कॉग्रसेचे नेते विदर्भवादी होते. दिवंगत मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार हे सुद्धा प्रारंभी कट्टर विदर्भवादी होते. मुंबईत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू असताना कन्नमवारांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ताणून धरला होता. तेव्हा ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. मात्र याच काळात पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण आणि मा.सा. कन्नमवार यांची बंदद्वार चर्चा झाली. अखेर राजकीय तडजोडीतून कन्नमवारांनी संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिल्याची आठवण आजही चंद्रपूर जिल्ह्यातील जुन्या जाणत्या जेष्ठांना आहे.याच काळात बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे, अ‍ॅड. केशवराव नालमवार, शांताराम पोटदुखे आदी मंडळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीकडे वळली. मात्र यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात मोठी आंदोलने झाल्याचे ऐकिवात नाही. १९५८-५९ या काळात हे आंदोलन ऐन भरास आले असताना आचार्य प्र.के. अत्रे यांचे व्याख्यान चंद्रपुरातील गांधी चौकात झाल्याची आठवण माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या स्मरणात आहे. त्यांच्या व्याख्यानाने आणि त्यांच्या नर्मविनोदी शैलीने वातावरण कसे घडविले होते, याची आठवण ते सांगतात. १ मे १९६० मध्ये महाराष्ट्रदिनाचा पहिला शासकीय सोहळा ज्युबिली शाळेच्या मैदानावर झाला होता. या समारंभात जनता मोठ्या संख्येने सहभागी होती. तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी हा समारंभ आयोजति केला होता.संयुक्त महाराष्ट्राच्या निर्र्मीतीमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह अहेरी, गडचिरोली हे विकासाच्या प्रवाहात जोडले जातील अशी कै. मा.सा. कन्नमवारांची अपेक्षा होती. याच अपेक्षेने चंद्रपुरातील मंडळीही या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतरली होती. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठोस असे काही मिळाले नाही. भद्रावतीमध्ये आयुधे निर्माण करण्याचा कारखाना आला. चंद्रपूर शहरात जिल्हा सामान्य रूग्णालय उभे राहीले. एक उड्डाण पूलही नंतरच्या काळात झाला. मात्र सिंचन, दळणवळ या दृष्टीने म्हणावा तसा विकासाला वाव मिळाला नाही. गडचिरोली, अहेरी हा ऐके काळी चंद्रपूरचाच असलेला भाग आजही उपेक्षितच आहे. विकासाची स्वप्न खुप सारी होती. मात्र विदर्भाचा अनुशेष सतत वाढतच राहिला. यातूनच स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा उचल खात आहे.