शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी, धानपट्टा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:01 IST

मागील चार ते पाच दिवसांपासून चंद्रपुरात दररोज पाऊस येत आहे. सकाळच्या सुमारास ऊन्ह असते. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरूवात होते. बुधवारीदेखील असेच झाले. बुधवारी दुपारी १.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्रीपर्यंत अधेमधे पावसाची रिपरिप सुरूच होती. चंद्रपूरसह जिल्ह्यातील घुग्घुस, भद्रावती, राजुरा, कोरपना, मूल, सिंदेवाही या तालुक्यांमधेही पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देसरासरी ४४४.२ मिमी पाऊस : दमदार पावसाअभावी धानपट्ट्यातील रोवण्या खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात दररोज पाऊस हजेरी लावत आहे. बुधवारी चंद्रपूरसह अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र जिथे पावसाची अधिक गरज आहे, अशा चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड या धान उत्पादक तालुक्यात अद्यापही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे तेथील शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.मागील चार ते पाच दिवसांपासून चंद्रपुरात दररोज पाऊस येत आहे. सकाळच्या सुमारास ऊन्ह असते. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरूवात होते. बुधवारीदेखील असेच झाले. बुधवारी दुपारी १.३० वाजता पावसाला सुरुवात झाली.त्यानंतर रात्रीपर्यंत अधेमधे पावसाची रिपरिप सुरूच होती. चंद्रपूरसह जिल्ह्यातील घुग्घुस, भद्रावती, राजुरा, कोरपना, मूल, सिंदेवाही या तालुक्यांमधेही पावसाने हजेरी लावली.मूलमध्ये मुसळधारमूल : मागील आठवडयात पावसाने ब्रेक लावल्याने अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळबली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून तुरळक पाऊस पडत असल्याने काही शेतकऱ्यांनी समाधान मानत रोवणीच्या कामाला सुरूवात केली. बुधवारी दुपारी अचानक मूलमध्ये मुसळधार पाऊस पडला. अनेक मोकळ्या भूखंडात व वस्त्यांमधील रस्त्यावर पाणी साचले. अचानक असा पाऊस आल्यामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडाली. यावर्षी पावसाला सुरूवात झाली खरी, परंतु पाहिजे तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे पºहे टाकण्यापासून तर रोवणीच्या कामापर्यंत शेतकºयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे तालुक्यात केवळ ४३.९ टक्के रोवणी होऊ शकली.नागभीडमध्ये वाकुल्यानागभीड : परिसरात ढगाळ वातावरण राहत असले तरी जोरदार पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांत हलका पाऊस पडला. या पावसावर व मोटारपंपाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी रोवणी उरकली. पण आता पाऊसच पडत नसल्याने ही रोवणी करपायला सुरूवात झाली आहे. सध्या पडत असलेला पाऊस केवळ पऱ्हे जगविण्याच्या कामी येत आहे. तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. असले तरी आतापर्यंत तालुक्यात ३५ ते ४० टक्के रोवणी उरकल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊस