शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचे जगणे झाले सुकर

By admin | Updated: May 21, 2015 01:21 IST

उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे ...

रुग्णांसाठी वरदान : राजीव गांधी जीवनदायी योजना राजकुमार चुनारकर खडसंगीउपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील गरीब दारिद्र्यरेषेखालील अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहे. या योजनेत शासन करोडो रुपये खर्च करीत आहे. या योजनेत काही त्रुट्या असल्यातरी या योजनेचा गोरगरीब रुग्णांना फायदा होत असल्याने योजनेने जिल्ह्यातील गरिबांचे जगणे सूकर केले आहे.दोन वर्षाअगोदर काँग्रेस सरकारने राज्यात सर्वप्रथम रायगड, सोलापूर, नांदेड, गडचिरोली, मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यात ही योजना सुरु केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २७ जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०१३ पासून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयात रुग्णावर उपचार केला जातो. या योजनेमध्ये नॅशनल ईन्सुरन्स कंपनीकडून रुग्णालयाला रक्कम देण्यात येते. त्यामुळे या कंपनीचेसुद्धा योगदान आहे. या योजनेमधून कुटुंबातील एकाला दीड लाख रुपये खर्च देण्यात येतो. या व्यतिरिक्त कीडनी प्रत्यारोपनासाठी अडीच लाखांची तरतूद राज्य शासनाने केली आहे.राजीव गांधी जीवनदायी योजनेत ९७१ विविध आजारावर उपचार करता येतात. कार्डीयाल (हृदयरोग, हृदयविकार), कीडनी (मुत्रपींड), स्त्रीयांचे आजार, फुफ्फुस आदी मोठ्या आजारांचा यात समावेश आहे. कॅन्सर, कीडनी स्टोन, मेंदू हाडाचे विकार, भाजून जखमी, डोळ्यांचे विकार, लहान मुलांचे उपचार अशा आजाराचा या योजनेत समावेश आहे. जिल्ह्यात राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजनेअंतर्गतत चिमूर उपजिल्हा रुग्णालयामार्फत अंगणवाडी व शाळामधील शुन्य ते अठरा वयोगटातील सन २०१३-१४ व १४-१५ या वर्षात ४१ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये हृदय शस्त्रक्रिया- १३, हर्निया- १०, तिरळेपना- ३, दुंभगलेले ओठ- २, जन्मजात मोतीबिंदू ४, हायट्रोसीअल- ३, गाठीचे ५, आयडेन्डेटेस्ट- १ या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.