शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा येथील पाईप लाईन लिकेज

By admin | Updated: May 21, 2015 01:22 IST

तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पोंभुर्णा वस्तीमध्ये घाटकूळ येथील अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो.

पोंभुर्णा: तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पोंभुर्णा वस्तीमध्ये घाटकूळ येथील अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. सदर पाईप लाईन अनेक ठिकाणी लिकेज झाली आहे. त्यातून निघणारे पाणी शेतशिवारात साचल्याने त्याठिकाणी पाण्याचा पूर आलेला आहे. तर गावामध्ये मात्र पाणी टंचाई असल्याने रामनगर येथील महिला व्हॉल्व्हमधून येणाऱ्या गळतीच्या पाण्यावर आपली तहान भागवित आहेत. याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.पोंभुर्णा येथे घाटकूळ येथील अंधारी नदीच्या पात्रातून पाण्याचा पुरवठा केला जातो. सदर कंत्राट सावली तालुक्यातील साखरी येथील गड्डमवार या कंत्राटदाराकडे असून ते याकडे नेहमीच दुर्लक्ष करीत असतात. याठिकाणी पाईप लाईन लिकेज होणे ही नित्याचीच बाब आहे. यावर मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचेसुद्धा अंकुश नसल्याने कंत्राटदाराचे मात्र फावत आहे. गावातील ग्रामस्थांना मात्र पाणी टंचाई समस्येचा सामना करावा लागत आहे. सदर पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन वेळवा रोडला लागून असलेल्या स्मशानभूमीच्या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याने त्या ठिकाणच्या शेतशिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याच ठिकाणी गावातील गुरे-ढोरे बसतात. त्यामुळे नागरिकांना मिळणारे पिण्याचे पाणी दूषित होत असल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)