शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकारीच पॉझिटिव्ह निघाल्याने शहरात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:01 IST

वरोरा तालुक्यात कोरोनाचे रूग्ण बहुतांश बाहेर गावावरून आल्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या वरोरा शहर व ग्रामीण भागात ४० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. वरोरा शहरातील ट्रॉमा केअर युनिट येथे अ‍ॅन्टिजेन टेस्ट केंद्र सुरू केल्याने कोरोना रुग्णांचे अहवाल तातडीने मिळत आहे. तीन दिवसांपूर्वी वरोरा शहरातील एका डॉक्टरला कोरोना सदृश्य लक्षणे आढळली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. शहरातील वैद्यकीय क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव केला आहे. एका वैद्यकीय अधिकाऱ्याची चाचणी पॉझिटीव्ह निघाल्याने वरोरा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.वरोरा तालुक्यात कोरोनाचे रूग्ण बहुतांश बाहेर गावावरून आल्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या वरोरा शहर व ग्रामीण भागात ४० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. वरोरा शहरातील ट्रॉमा केअर युनिट येथे अ‍ॅन्टिजेन टेस्ट केंद्र सुरू केल्याने कोरोना रुग्णांचे अहवाल तातडीने मिळत आहे. तीन दिवसांपूर्वी वरोरा शहरातील एका डॉक्टरला कोरोना सदृश्य लक्षणे आढळली होती. त्यांची अ‍ॅन्टिजन टेस्ट केली असत पॉझिटिव्ह निघाली. या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या रूग्णांची व कर्मचाऱ्यांची तातडीने कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली. बाधित डॉक्टर हे एखाद्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना बाजारात होणारी गर्दी त्यातच काही शैक्षणिक संस्थांनी प्रवेश देण्याकरिता प्रवेश ऑनलाईन सुरू केले नाही त्यामुळे अशा अनेक प्रमाणात गर्दी दिसून येत. या ठिकाणी कुठलेही नियम कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखतांना पाळले जात नसल्याने अशा गर्दीवर अंकुश ठेवणे गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तालुक्यातील ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या