शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समित्याच घाणीच्या विळख्यात

By admin | Updated: November 12, 2014 22:40 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान सुरु करुन स्वच्छतेचा कानमंत्र दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार देशभर स्वच्छता अभियान धडाक्यात राबविले जात आहे. या अभियानात

दिव्याखाली अंधार
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान सुरु करुन स्वच्छतेचा कानमंत्र दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार देशभर स्वच्छता अभियान धडाक्यात राबविले जात आहे. या अभियानात सरकारी कार्यालयेही सहभागी आहेत. मात्र, ज्या विभागांवर स्वच्छता अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी आहे, तेच कार्यालये घाणीच्या विळख्यात सापडले आहेत. पंचायत समिती कार्यालयांची स्वच्छता नेमकी कुठपर्यंत आली आहे, हे पाहण्यासाठी आज लोकमत चमूने भेटी देऊन तेथील स्वच्छतागृह, परिसराची परिस्थिती जाणली. मात्र, पंचायत समित्यांत दिव्याखालीच अंधार असल्याचे अतिशय विदारक चित्र जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयांत लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले आहे. कार्यालयातील कर्मचारीही अस्वच्छतेमुळे त्रस्त आहेत. परंतु स्वत: स्वच्छता करण्याची त्यांची तयारी नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
जिवती पंचायत समितीत कागदावर स्वच्छता
पाच हजार लोकसंख्येच्या जिवती पंचायत समितीत दुपारी १.३० वाजताच्या सुमारास भेट दिली असता, स्वच्छता अभियान केवळ कागदावर दिसून आले. फलक लावून जनजागृतीचा संदेश देणाऱ्या कार्यालयातच स्वच्छतेचे ंिधंडवडे निघाले असून स्वच्छतागृहे तंबाखू, खर्रा, गुटख्याने रंगलेली आहेत. तर मुत्रीघरात पाण्याची सुविधा नसल्याने येथे सर्वत्र दुर्गधी पसरली आहे. कार्यालय परिसरात कचरा कुंडी नसल्याने कचरा सर्वत्र पसरलेला दिसून आला. असाच प्रकार इतरही कार्यालयात दिसून आला. त्यामुळे शासकीय कार्यालयात स्वच्छतेसाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या जात आहे, हे स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून दिसून आले.
राजुरा पंचायत समितीत स्वच्छतेचे तीन-तेरा
राजुरा येथील पंचायत समितीत स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे. आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली असता, स्वच्छतेचे अतिशय विदारक चित्र दिसून आले. शौचालयाची स्वच्छता गेल्या अनेक दिवसांपासून केलेली नाही. त्यामुळे सीट काळीकु ठं झाली आहे. परिसरात असलेला हातपंप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून हातपंपाजवळ कचऱ्याचे ढिग जमा झाले आहे. कृषी विभाग कार्यालयाच्या मागच्या बाजुला शेतकऱ्यांना वाटण्यासाठी बैलबंडी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. तर कार्यालयातच महत्वाच्या कामाच्या फाईली अस्ताव्यस्त ठेवलेल्या दिसून आल्या.