शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून दारूची अधिकृत विक्री सुरू हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

बहुप्रतीक्षेनंतर जिल्ह्यात अधिकृत दारू सुरू होणार आहे. यासाठी उत्पादन शुल्क विभागाने एक  खिडकी सुरू केली असून त्या माध्यमातून दारू दुकानांना परवाने मंजूर केले जात आहे. विशेष म्हणजे, परवाना अर्जातील त्रुटी दुुरुस्त करून जिल्ह्यात ९८ दारू परवाने मंजूर करण्यात आले असून संबंधितांच्या हातात परवाने पोहचले आहे. मात्र कोरोना निर्बंधामुळे शनिवार तसेच रविवार कडक बंद पाळला जात आहे.

ठळक मुद्देसोमवारी दुपारपर्यंत मद्यपींची प्रतीक्षा संपण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने परवाने देणे सुरू केले. जिल्ह्यात ९८ दारू परवाने मिळाले असून सोमवारी आणखी ५० जणांना परवानगी मिळणार आहे. ज्यांना परवानगी मिळाली आहे, ते दारू विकण्यास मोकळे झाले आहे. मात्र त्यांच्याकडे दारूचा स्टाॅक नाही. शनिवार, रविवारी टाळेबंदी असल्याने परवानाधारक परवानगी मिळूनही दारूची आयात करू शकले नाही. मात्र सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात अधिकृत दारू येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच दारूची दुकानातून विक्री सुरू होणार आहे.बहुप्रतीक्षेनंतर जिल्ह्यात अधिकृत दारू सुरू होणार आहे. यासाठी उत्पादन शुल्क विभागाने एक  खिडकी सुरू केली असून त्या माध्यमातून दारू दुकानांना परवाने मंजूर केले जात आहे. विशेष म्हणजे, परवाना अर्जातील त्रुटी दुुरुस्त करून जिल्ह्यात ९८ दारू परवाने मंजूर करण्यात आले असून संबंधितांच्या हातात परवाने पोहचले आहे. मात्र कोरोना निर्बंधामुळे शनिवार तसेच रविवार कडक बंद पाळला जात आहे. परवाने मिळूनही दारूच्या अधिकृत डीलर्सकडे मागणी नोंदविताच आली नाही. परिणामी सोमवारी नोंदणी करून अधिकृत दारू जिल्ह्यात पोहचणार आहे. मात्र यासाठी किमान दुपारपर्यंत तरी वाट बघावी लागणार आहे.विशेष म्हणजे, कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने निर्बंध घातले आहे. त्यानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहे. काही परवानाधारकांनी नागपूर गाठले असून कोणत्याही परिस्थितीत दारू आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.

होलसेल विक्रेता नाहीजिल्ह्यामध्ये दारू विक्रीसाठी होलसेल विक्रेता नाही. त्यामुळे नागपूर किंवा इतर जिल्ह्यांवर येथील व्यावसायिकांना अवलंबून रहावे लागते. त्यामुळे परवानगी मिळूनही नागपूर येथून दारू आणण्यासाठी किमान चार ते पाच तास वेळ लागू शकतो. परिणामी सोमवारी दुपारपासून अधिकृत दारू विक्री सुरू होईल, असा अंदाज आहे. 

मद्यपींमध्ये आनंदजिल्ह्यात अधिकृत दारू दुकाने सुरू होत असल्याने मद्यपींमध्ये आनंद आहे. केव्हा एकदा वैध दारू विक्री सुरू होते आणि केव्हा प्यायला मिळते, असे मद्यपींचे झाले आहे.

नोकरांसाठी धावपळ- जिल्ह्यात ९८ दारू दुकानांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी व्यवस्था अपडेट करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी नोकरांची मागणी वाढली आहे. मात्र जे जास्त पगार देणार त्यांच्याकडे नोकरवर्ग जात असल्यामुळे व्यावसायिकांची धावपळ सुरू झाली आहे.

सैराट होऊ नका- जिल्ह्यात अधिकृत दारू सुरू होत आहे. त्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला असला तरी  दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे दारू सुरू झाली म्हणून सैराट होणे चुकीचे असून आपल्यामुळे समाज तसेच कुटुंबातील व्यक्तींना त्रास होऊ नये, असे वागणे योग्य ठरेल.

रंगरंगोटी अंतिम टप्प्यात- परवानगी मिळताच दारू दुकानांची रंगरंगोटी तसेच स्वच्छता आता अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील बार तसेच दारू  दुकाने आता सजली आहे. विशेष म्हणजे, शहराबाहेरील ज्या बारच्या इमारती मागील सहा वर्षांपासून धूळ खात पडल्या होत्या. त्या इमारतीही आता चकाकू लागल्या आहेत.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी