शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहित पती-पत्नीच्या मृत्यूचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रुचिता चिट्टावार हिचा विवाह मूळच्या चिमूर तालुक्यातील महादवाडी गावच्या किशोर खाटीक यांच्याशी झाला. आई अपंग आणि वडिलाचे छत्र हरपलेल्या रुचिताचा विवाह मामाने तीन महिन्यांपूर्वी लावून दिला होता. अशातच पती किशोर चंद्रपुरात नोकरीला होता. हे पती-पत्नी चंद्रपुरात सुखाने नांदत होते. अशातच काही दिवसांपूर्वी रुचिता माहेरी भंगाराम तळोधीला आली. पत्नी माहेरी गेल्याने पत्नीविना न करमल्याने किशोरदेखील भंगाराम तळोधीत दाखल झाला.

ठळक मुद्दे पोलीस तपास सुरू : पतीवर चिमुरात स्वगावी अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवढोली : तालुक्यातील भंगाराम तळोधीत रविवारी नवविवाहित गर्भवती महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला. सोमवारी तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना पतीनेही पेटत्या चितेवर उडी मारली. यावेळी उपस्थितांनी त्याला चितेबाहेर ओढले. मात्र स्वत:ला संपविण्याचा निर्धार केलेल्या पतीने चितेलगतच्या विहिरीत उडी मारली. त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. सोमवारी उशिरा पतीच्या शवविच्छेदनानंतर त्याच्यावर चिमुरातील स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात आला. अल्पावधीतच सुखी संसाराचा शेवट झाला. मात्र या नवविवाहित पती-पत्नीच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे.गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रुचिता चिट्टावार हिचा विवाह मूळच्या चिमूर तालुक्यातील महादवाडी गावच्या किशोर खाटीक यांच्याशी झाला. आई अपंग आणि वडिलाचे छत्र हरपलेल्या रुचिताचा विवाह मामाने तीन महिन्यांपूर्वी लावून दिला होता. अशातच पती किशोर चंद्रपुरात नोकरीला होता. हे पती-पत्नी चंद्रपुरात सुखाने नांदत होते. अशातच काही दिवसांपूर्वी रुचिता माहेरी भंगाराम तळोधीला आली. पत्नी माहेरी गेल्याने पत्नीविना न करमल्याने किशोरदेखील भंगाराम तळोधीत दाखल झाला. कुठलाच वादविवाद नसताना रविवारी रुचिता घराबाहेर पडली. बराच वेळ घरी न परतल्याने शोधाशोध केली असता तिचा मृतदेह गावाबाहेरील विहिरीत आढळून आला. दुसऱ्याच दिवशी तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना किशोरनेही आत्महत्या केली. गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. पती-पत्नीच्या संसारात वितुष्ट नव्हते, हे विशेष.

टॅग्स :Policeपोलिस