स्मार्टफोन नसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मनपा शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:00:52+5:30

कोरोना टाळेबंदी ३१ जुलैपर्यंत असल्याने शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा व कॉन्व्हेंटमध्ये अगदी पहिल्या दिवसांपासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मात्र जिल्हा परिषद व महानगर पालिकेच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात.

Municipal teachers to students without smartphones | स्मार्टफोन नसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मनपा शिक्षक

स्मार्टफोन नसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे मनपा शिक्षक

Next
ठळक मुद्देअभिनव उपक्रम : दररोज दहा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे मुलांचेशिक्षण नुकसान होवू नये, यासाठी चंद्रपूर महानगर पालिका शाळेच्या शिक्षकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विद्यार्थ्यांच्या घरी जावून अध्यापन करण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम सात दिवसांपासून सुरू केला आहे. इंग्रजी माध्यमांच्या बहुतांश शाळा ऑनलाईन शिक्षण देत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्मार्टफोन उपलब्ध नसणाºया पालकांसाठी हा उपक्रम आत्मविश्वास वाढविणारा ठरला आहे.
कोरोना टाळेबंदी ३१ जुलैपर्यंत असल्याने शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा व कॉन्व्हेंटमध्ये अगदी पहिल्या दिवसांपासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मात्र जिल्हा परिषद व महानगर पालिकेच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात.
त्यामुळे त्यांच्याकडे स्मार्टफोन नसतो, यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे कठीण आहे. मात्र महानगर पालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, प्रशासकीय अधिकारी (शिक्षण) नागेश नीत यांनी कल्पकता वापरून ‘शाळा बंद शिक्षण’ सुरू हा उपक्रम सुरु केला आहे. सध्या पालक व विद्यार्थ्यांचाही शाळा बंद ठेवण्याचा आग्रह आहे. मात्र शिक्षण सुरू ठेवायचे आहे.
महानगर पालिकेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षतात. १० टक्के विद्यार्थ्यांकडेच मोबाईल आहे. त्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
महानगर पालिका अंतर्गत शहरात पहिली ते दहावी पर्यंतच्या २९ शाळा आहेत. त्यामध्ये २ हजार ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये ७४ शिक्षक कार्यरत आहेत. सर्व ७४ शिक्षकांनी दररोज दहा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षणाचे धडे देण्यासाठी नियोजन केले.
याबाबत आयुक्त राजेश मोहिते यांच्या सूचनांचे पालन करण्यात आले. एखाद्या प्रभागात जर आठ ते दहा विद्यार्थी जवळ राहात असतील तर त्यांना एकत्र एकाच घरी आणून तिथेच वर्ग घेणे सुरू केले आहे. आठवडाभरापासून हा उपक्रम महापालिकेच्या सर्व शाळा राबवित आहेत. दहा विद्यार्थ्यांचा ४५ मिनिट वर्ग घ्यायचा आहे. त्यानंतर दुसºया दिवशी दुसरे दहा विद्यार्थी असा क्रम ठरविण्यात आला. हा वर्ग घेताना विद्यार्थ्यांना घरी अभ्यासक करण्यासाठी गृहपाठ तथा इरत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सूचना द्यायची विशेष म्हणजे या उपक्रमाला विद्यार्थी व पालक यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी व शिक्षक मास्क लावून सॅनिटायझरने हात स्वच्छ करून शिक्षण घेत आहेत. प्रशासकीय अधिकारी अतिशय सुरेख पद्धतीने घरोघरी शिक्षक वर्ग घेत आहेत.
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातून पुस्तके मोफत घरपोच देण्यात आली. या उपक्रमामुळे शहरातील सर्वसामान्य पालकांनी समाधान व्यक्त केले. शिक्षक पालकांच्या सूचनांची नोंद घेत आहेत.

शाळा बंद मात्र शिक्षण सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून जिल्ह्यात काही शाळा सुरू झाल्या आहेत. इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट शाळांनीही ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या चांगल्या श्रेणीतील आहेत. उद्योग,व्यवसाय व नोकरदार कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने अशा पालकांना स्मार्टफोनची समस्याच नाही.मात्र, गोरगरीब कुटुंबातील पालकांना उदरनिर्वाहासाठीच मोठा संघर्ष करावा लागतो. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांचा रोजगार बुडाला. मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलने कदापि झेपत नाही. कुटुंबाला शिक्षणाची पार्श्वभूमी असेलच याचीही खात्री नाही. अशा विषम सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीत चंद्रपूर महानगर पालिकेने विद्यार्थ्यांसाठी ‘शाळा बंद शिक्षण’ उपक्रम अंतर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन वर्ग घेत शिक्षणाचे धडे देणे सुुरू केले आहे.

कोरोनामुळे शिक्षणाच्या पारंपरिक संकल्पनांचा नव्याने विचार करण्याची वेळ आणली. शाळा सुरूच करता येत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय, हा प्रश्न सर्व शिक्षकांना सतावत होता. त्यामुळे यावर खूप चर्चा करण्यात आली. आयुक्त राजेश मोहिते यांनी ’शाळा बंद शिक्षण सुरू’ या उपक्रमाला भक्कम पाठबळ दिले. त्यामुळे शक्य झाले.
- नागेश नित, प्रशासकीय अधिकारी शिक्षण, मनपा,चंद्रपूर

Web Title: Municipal teachers to students without smartphones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा