शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि खाणीमुळे माजरी प्रदूषणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

वेकोलिच्या खुल्या खाणीत उत्पादन झालेल्या कोळशाचे मोठे दगड क्रेशर मशीनद्वारे बारिक करीत असताना मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. परिसरात वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने माजरीकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. दरम्यान, पीडित नगरिकांनी आमचे पुनर्वसन करा. अन्यथा वेकोलि प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करू, असा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देब्लास्टिंगमुळे घरांनाही भेगा : आरोग्य धोक्यात, गावकरी म्हणतात, पुनर्वसन करतात

राजेश रेवते ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वेकोलि माजरीच्या नागलोन २ या खुल्या कोळसा खाणीतून होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे व या खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे अनेकांची घरे पडली. अनेकांच्या घरांना भेगा पडल्या आहेत. तसेच कोळसा उत्पादनाकरिता मोठे-मोठे मातीचे ठिगारे उभे केल्याने गावात वस्तीलगत वेकोलिचे रसायनयुक्त पाणी साचले आहे. साचलेल्या रसायनयुक्त पाण्यामुळे अनेकाचे आरोग्य धोक्यात आले आहे.वेकोलिच्या खुल्या खाणीत उत्पादन झालेल्या कोळशाचे मोठे दगड क्रेशर मशीनद्वारे बारिक करीत असताना मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. परिसरात वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने माजरीकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. दरम्यान, पीडित नगरिकांनी आमचे पुनर्वसन करा. अन्यथा वेकोलि प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करू, असा इशारा दिला आहे.स्थानिक नागरिकांना भविष्यात गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान वायु प्रदूषणामुळे माजरी परिसरात बहुतांश नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, डोळ्यांचे आजार, कर्करोग, दमा, चर्मरोग, पोटाचे विकार तसेच अन्य विकार जडत आहेत. या सर्व समस्या लक्षात घेत माजरी क्षेत्रातील अनेक नागरिक, लोकप्रतिनिधींनी वारंवार या समस्याची तक्रार जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, वेकोलिचे डायरेक्टर पर्सनल, वेकोलि माजरीचे मुख्य महाप्रबंधक व संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र या समस्याकडे वेकोलि प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.यांच्या घरांचे नुकसानवेकोलिच्या ब्लॉस्टिंगमुळे वार्ड क्र.१ मधील कैलाश मेश्राम, चंद्रभान गिन्नाके, ताराबाई मेश्राम, लिलाबाई मेश्राम, सुधाकर गेडाम, सुमनबाई येलादे, लक्ष्मी चांदेकर, मारोती नगराळे, खेमराज आत्राम, सुनिता आत्राम, शकून मडावी, सुमन मडावी, चंद्रकला शास्त्रकार, जिजाबाई जुमनाके, गीता जुमनाके, मीराबाई पेंदोर यांचे घर कोसळले आहे तर काही घरांना भेगा पडून मोठे नुकसान झाले आहे.ढिगाऱ्याला लागते आगया खुल्या खाणीत कोळशाच्या ढिगाऱ्याला अनेकवेळी आगी लागतात. अशावेळी तेथील विषारी धुरांमुळेसुद्धा माजरी परिसरात प्रदूषण मोठया प्रमाणात वाढले आहे. वेकोलि अधिकाऱ्यांना या संदर्भात अनेकदा विचारले असता आम्ही उपाय योजना करीत आहोत, असे सांगून टाळाटाळ केली जाते. वेकोलि प्रशासनाला याबाबत दखल घेवून तोडगा काढण्यासाठी वारंवार पत्र दिले. मात्र वेकोलि याकडे दुर्लक्ष करीत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणBlastस्फोट