शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी साहित्याने बाजार सजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

मागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्त होते. तसेच यंदादेखील सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे छत्री, रेनकोट यासह इतर वस्तूंची विक्री आठवडाभरात वेग येणार आहे. महिन्याच्या प्रारंभीच वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लास्टिक पेपर आणि अन्य साहित्य विक्रीसाठी आले आहेत.

ठळक मुद्देआला पावसाळा : ग्राहकांची व्यापाऱ्यांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असले तरी निसर्ग न चुकता आपली जबाबदारी पार पाडत आहेत. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सुनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे व्यावसायिकांनी पावसाळी साहित्य विक्रीसाठी आणले असून दुकाने सजवली आहे. लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने शिथिलता दिल्यामुळे सर्व दुकाने खुली करण्यात आले आहे. छत्र्या, रेनकोट या खास पावसाळी वस्तूंची विक्री करणारी दुकाने गजबजले आहे.मागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्त होते. तसेच यंदादेखील सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे छत्री, रेनकोट यासह इतर वस्तूंची विक्री आठवडाभरात वेग येणार आहे. महिन्याच्या प्रारंभीच वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लास्टिक पेपर आणि अन्य साहित्य विक्रीसाठी आले आहेत.लहान आकाराच्या छत्र्याही दाखलबहुतांश छत्र्या एकच घडीच्या असतात. आता मात्र त्यात बदल झाला असून तीन घडी करुन अगदी लहान आकार होणाºया छत्र्यादेखील दाखल झाल्या आहेत. अशा लहान छत्र्या यावर्षी आकर्षण राहणार आहे. महिलांसाठी रंगीबेरंगी आणि बालकांच्या कार्टुन्सच्या चित्रांनी सजलेल्या छत्र्यांचा आकर्षक लूक ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत.कार्टून रेनकोटलहान मुलांमध्ये आकर्षण असलेल्या कार्टूनची प्रिंट असलेले रेनकोट्सदेखील दाखल झाले आहेत. डोरेमॅन, स्पायडर मॅन, नोबिता अशा विविध कार्टून्सची चित्र असलेल्या रेनकोट्सचे आकर्षण मुलांमध्ये असते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या प्रकारातीह रेनकोट्सदेखील आणले आहे. त्याचबरोबर छोटा भीम, शक्तीमान यासारख्या सुपर हिरोंच्या रेनकोट्सनादेखील बाजारात मागणी वाढण्याची शक्यता आहे. लहान मुलांच्या आवडत्या कार्टुनसोबतच क्रिष्णा, भीमच्या चित्रांचे रेनकोट देखील बाजारात बालकांचा आकर्षणचा केंद्रबिंदू ठरत आहेत. सध्या बालकांच्यासाठीची खरेदी फारशी नसली तरी पुढील महिन्यात या मालाला मागणी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :RainपाऊसMarketबाजार