शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत ‘घाणीचा’ बाजार !

By admin | Updated: June 27, 2015 01:27 IST

शेतमालाला किफायतशीर मूल्य मिळावे, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली.

चंद्रपूर : शेतमालाला किफायतशीर मूल्य मिळावे, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली. बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसह अडते, व्यापारी, विक्रेते, ग्राहक यांना सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची आहे. मात्र चंद्रपूर बाजार समितीला भेट दिली असता, बाजार समितीत कृषी मालाचा नाही तर ‘घाणीचा बाजार’ भरत असल्याचे दृष्य दिसून आले. येथील घाणीमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून क्षणभर थांबणेही कठीण जाते. येथील दुर्गंधीमुळे सारेच त्रस्त असून बाजार समिती प्रशासन मात्र नियमीत स्वच्छता केली जात असल्याचे सांगत आहे. गुरूवार दुपारी १ वाजताची वेळ, बाजार समितीत काहीसा शुकशुकाट होता. प्रवेशद्वारावरून आत प्रवेश करताच अतिशय खराब दुर्गंधीचा सामना करावा लागला. प्रवेशद्वारालगतच फळ व्यापाऱ्यांचे गाळे आहेत. पावसामुळे खराब झालेले, सडलेले फळ बाजार समितीच्या अगदी प्रवेशद्वारालगत रस्त्याच्या कडेला ढीग टाकण्यात आले होते. या सडलेल्या फळांवर जनावरांचा हौदोस आणि माश्यांचा गोंगाठ दिसून आला. बाजार समितीच्या परिसरात फेरफटका मारला असता, स्वच्छतेबाबत कमालीची दुुर्लक्षता दिसून आली. धान, सोयाबीन, तूर आदी माल खरेदीसाठी असलेले बरेच गाळे आवकअभावी बंद अवस्थेत होते. या गाळ्यांसमोर व बाजार समितीच्या आवारात जनावरांची विष्ठा सर्वत्र पसरलेली होती. तर गाळ्यासमोरील नालीतही मोठ्या प्रमाणात केरकचरा साचल्याचे दिसून आले. सब्जी मंडीतही हाच प्रकार निदर्शनास आला. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सडलेले माल टाकण्यासाठी कचरा कुंडीची व्यवस्था नाही. त्यामुळे सर्व अडते, विक्रेते हे मोकळ्या जागेत कचरा टाकत असतात. फळांची विक्री होत असलेल्या गाळ्यांच्या लगतच बाजार समिती प्रशासनाने कचरा टाकण्याची व्यवस्था केली आहे. मात्र तेथे कोणीही कचरा टाकत नाही. मोकळ्याच जागेत कचरा टाकले जात असल्याने दुर्गंधीमुळे शेतकरी, व्यापारी, अडते सारेच त्रस्त आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)विकत घ्यावे लागते पाणीबाजार समिती परिसरात पाण्यासाठी जलकुुंभ उभारण्यात आले आहे. जलकुंभाद्वारेच बाजार समितीच्या नळांना पाणी पुरवठा होतो. मात्र या टाकींची स्वच्छता होत नसल्याने नळांना दूषित पाणी येते. त्यामुळे अनेक व्यापारी, अडत्यांना पाणी विकत घेऊन प्यावे लागत असल्याचे एका फळ व्यापाऱ्याने सांगितले.बाजार समिती प्रशासनाकडून नियमित स्वच्छता केली जाते. मात्र पावसामुळे फळ, भाजीपाला सडण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नियमीत स्वच्छता करूनही दुर्गंधी पूर्णपणे दूर होत नाही. कचरा साचलेल्या जागी स्वच्छता करून दुर्गंधी येऊ नये यासाठी ब्लिचिंग पावडर टाकले जात आहे. कचरा इतरत्र टाकला जाऊ नये, यासाठी कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ‘त्या’ कचरा कुंडीत सध्या कचरा टाकले जात नाही. यासाठी लवकरच व्यवस्था करण्यात येणार असून पाण्याच्या टाकीची नियमीत स्वच्छता केली जाते. - संजय पावळे, सचिव, कृउबास चंद्रपूर.