शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य रोजगारयुक्त करु या

By admin | Updated: May 2, 2015 01:05 IST

राज्यातील सरकार गरीब, मजूर व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही दु:खदायक बाब आहे.

चंद्रपूर : राज्यातील सरकार गरीब, मजूर व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही दु:खदायक बाब आहे. त्यामुळे या घटना शून्यावर आणत रोजगारयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करु या, असे आवाहन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपुरातील पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाचा मुख्यसमारंभ पार पडला. यावेळी ते जनतेला दिलेल्या संदेशात बोलत होते. महाराष्ट्र दिनाच्या समारंभाला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचलार्वार, माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन आदी प्रामुख्याने उपस्थित होते.मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर ना. मुनगंटीवार यांनी जिल्हावासियांना संबोधित केले. ते म्हणाले, चंद्रपूर जिल्हयात चंद्रपूर- बल्लारपूर मार्गावर सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर १२२ एकर जागेवर सैनिकी शाळा उभारण्याचे प्रस्तावित आहे. दारिद्रय रेषेखालील विविध घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वत:ची जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणारी अभिनव पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना नुकतीच अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभाथ्यार्ला घरकुलासाठी जागा खरेदी करण्याकरिता ५० हजार रूपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेसाठी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दजार्चे पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकांचा विकास तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तपोभूमी गोंदोडाच्या स्थळांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.दारुबंदीकडून व्यसनमुक्तीकडे वाटचाल करावयाची आहे. यासाठी नागरिक व तरुण वर्गाच्या सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले. जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना आदी योजनेत जिल्हयाने प्रगती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रादरम्यान जलयुक्त शिवार प्रचार रथाला पालकमंत्र्यांनी दाखविली. तत्पूर्वी विविध पुरस्कारप्राप्त अधिकारी-कर्मचारी व खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस विभागाकडून त्यांनी मानवंदानाही यावेळी स्विकारली. या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)