शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्मनाचा आवाज ऐका, ध्येय साध्य होईल

By admin | Updated: January 11, 2016 00:59 IST

देशाचा मूळ निवासी समाज असलेल्या कोयावंशीय गोंडीजनात परकिय टोळ्यांनी व्यसनाधिनता वाढविली.

नागेश घोडाम यांचे प्रतिपादन : मंगी (बु.) येथे गोंडी धर्म संमेलनसास्ती : देशाचा मूळ निवासी समाज असलेल्या कोयावंशीय गोंडीजनात परकिय टोळ्यांनी व्यसनाधिनता वाढविली. त्याचा अनिष्ट परिणाम आमच्या समाज जीवनावर होत असून आम्ही विकासापासून कोसोदूर जात आहोत. मात्र मंगीवासीयांनी स्वच्छतेचा स्वीकार करुन व व्यसनाधिनतेचा ठोकर मारुन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांचा तो अंतर्मनाचा आवाज असल्याने तो प्रत्येकाने स्वत:च्या मनात रुजविल्यास कोणतेही यश किंवा ध्येय साध्य करण्यास वेळ लागणार नाही, अशी आर्त साद आदिलाबादचे (तेलंगणा) खासदार नागेश घोडाम यांनी घातली.मंगी (बु.) येथील गोंडी धर्म संमेलनात ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पुसाम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार आत्राम, सखु माझी, मसराम नागोराम, सिडाम आरजू, रावण इनवाथे, वीरेंद्र शाहा आत्राम, बाबुराव मडावी, दौलतराव कोरांगे, भीमराव मडावी, सीताराम कोडापे, शामराव कोटनाके, मनोज आत्राम, डॉ. निरांजन मेश्राम, नामदेव किन्नाके, दिवाकर कुळसंगे, कुंदा सलामे, राधा आत्राम, संभाजी लांडे, मुख्याध्यापक सीताराम मेश्राम, भुमक संघाचे अध्यक्ष संतोष मेश्राम उपस्थित होते.मंगी बु. हे आदिवासी उपयोजनेतील व ९० टक्के गोंड समाज असलेले गाव आहे. येथे गेल्या पाच वर्षांपासून ग्राम स्वच्छता व व्यसनमुक्तीच्या माध्यमातून गावाला व्यसनमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे येथे गोंडी धर्माचे धर्म गुरु पहांदीपारी कुपारलिंगोचे स्मृती स्थळ पेनठाणा (मंदिर) व सल्लाशक्तीचे बांधकाम करता आले. त्यांचे पूजन व लोकार्पण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर तोडासे , चिन्नुपा कन्नाके, गणपत कोडापे, राजू कोडापे, जलपत कोडापे, रामू गेडाम, सुंगाजी तोडासे, पैकुजी मडावी, दादाजी तलांडे, श्यामराव कन्नाके, सीताराम आत्राम, चंदू तोडासे, गणपत आळे, गजानन तुमराम, विश्वश्वर मरस्कोल्हे, नामदेव कोडापे, लक्ष्मण मेश्राम, लचपा कन्नाके यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक समिती अध्यक्ष परशुराम तोडासे यांनी केले. संचालन शंकर मेश्राम यांनी तर आभार बापुराव मडावी यांनी मानले. (वार्ताहर)