शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

ते स्मारक देते हौतात्म्याची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

चंद्रपुरातील हुतात्मा स्मारक शहीद जनार्दन जयराम उपगन्लावार व बाबुराव पुलेश्वर राजगोंड यांच्या स्मृतीनिमित्त उभारण्यात आले आहे. जनार्दन जयराम उपगन्लावार हे मूळ भद्रावतीचे होते. त्यांचा जन्म १८८७ तर मृत्यू १९४२ मध्ये झाला.त्यांनी देशाच्या स्वातंत्रलढ्यात सहभाग घेत देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. तर बाबुराव पुलेश्वर राजगोंड हे मूळ गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेले मोरमपल्ली या गावचे होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इंग्रजाविरुध्दच्या स्वातंत्रलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणीची आहुती दिली. देशासाठीचे त्यांचे हे योगदान भावी पिढ्यांना सातत्याने होत स्मरत रहावे, यासाठी चंद्रपुरातील नागपूर मार्गावर हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाची काही वर्षांपूर्वी अतिशय विदारक स्थिती होती. मात्र आता या स्मारकाचे नुतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे पुढे हे स्मारक हौतात्म्यांच्या आठवणींना कायम उजाळा देत राहणार आहे.साधारणता ७० वर्षांपूर्वी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील सिव्हील लाईन परिसरात हे स्मारक उभारण्यात आले. प्रारंभी हे स्मारक डौलाने उभे होते. मात्र त्यानंतर काही वर्ष प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या स्मारकाची काहिशी दूरवस्था झाली होती. या स्मारकाची महत्त्व भावी पिढींना समजावे, यासाठी स्मारकाजवळच तत्कालीन नगरपालिकेने वाचनालयाची निर्मिती केली. त्यानंतर विद्यार्थी, नागरिक या ठिकाणी येऊ लागले. पुन्हा हे स्मारक वीर शहिदांची आठवण करून देत राहिले. तत्कालीन नगरपालिकेकडून देखभालही होऊ लागली.चंद्रपुरातील हुतात्मा स्मारक शहीद जनार्दन जयराम उपगन्लावार व बाबुराव पुलेश्वर राजगोंड यांच्या स्मृतीनिमित्त उभारण्यात आले आहे. जनार्दन जयराम उपगन्लावार हे मूळ भद्रावतीचे होते. त्यांचा जन्म १८८७ तर मृत्यू १९४२ मध्ये झाला.त्यांनी देशाच्या स्वातंत्रलढ्यात सहभाग घेत देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. तर बाबुराव पुलेश्वर राजगोंड हे मूळ गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेले मोरमपल्ली या गावचे होते. त्यांचाही भारताच्या स्वातंत्रलढ्यात सहभाग होता. २१ ऑक्टोबर १८५८ रोजी तेदेखील देशासाठी शहीद झाले.मी शहीद स्मारकभारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे, ९ ऑगस्ट क्रांती दिन... स्वातंत्र्यासाठी १९४२ चा अखेरचा लढा. महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिला. ‘करेंगे या मरेंगे’च्या गगनभेदी घोषणेने अख्खा देश पेटून उठला. या आंदोलनात लाखो तरुणांनी सहभाग नोंदविला अन् बघता बघता सारा देशच जणू तुरुंग झाला. परंतु ९ ऑगस्टला देशात विविध ठिकाणी जनक्षोभ भडकला. या आंदोलनात अनेक वीरांनी प्राणाची पर्वा न करता ब्रिटिश सरकारविरोधात बंड पुकारले. अनेकांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्याच स्मरणार्थ प्रत्येक जिल्ह्यात शहीद स्मारके उभारण्यात आली. आज क्रांती दिनानिमित्त या स्मारकांच्या अवस्थेवर प्रकाश टाकणारे हे वृत्त...